शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एकीशी साखरपुडा तर दुसरीसोबत लग्न; वरात निघाली पण पोलिस ठाण्यात! 

By प्रशांत माने | Updated: May 18, 2023 17:47 IST

सहा वर्षापूर्वी पीडित मुलीला एका लग्न सोहळया दरम्यान सिध्दार्थ भेटला होता. तिच्या आईवडिलांना लग्न करत आल्याचे भासवत पीडित मुलीशी घरच्यांच्या सहमतीने साखरपुडा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: एकीशी साखरपुडा केला असताना तीची फसवणूक करीत दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी नवरोबा सिध्दार्थ शिंदे (वय ३१) याला लैंगिक अत्याचार आणि फसवणूकीच्या गुन्हयाखाली अटक करताना त्याचे वडील दिलीप आणि आई शांता या दोघांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सहा वर्षापूर्वी पीडित मुलीला एका लग्न सोहळया दरम्यान सिध्दार्थ भेटला होता. तिच्या आईवडिलांना लग्न करत आल्याचे भासवत पीडित मुलीशी घरच्यांच्या सहमतीने साखरपुडा केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध देखील प्रस्थापित केले. पुढे त्याने पैशांची अडचण सांगून तिच्याकडून लाखभर रुपये देखील उकळले. दरम्यान पिडीतेला साखरपुडा करून लग्नाचे वचन दिले असतानाही गावाकडील दुसऱ्या मुलीसोबत सिध्दार्थने मुंबईत दोन दिवसांपूर्वी लग्न केले.

ही माहीती पिडीत मुलीला समजताच तीने कुटुंबासह विष्णुनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि सिद्धार्थ विरोधात लैंगिक अत्याचार आणि फसवणूकीचा गुन्हा नोंदविला. आधी साखरपुडा झाला असल्याचे माहीती असूनही सि्ध्दार्थचे दुस-या मुलीसोबत लग्न लावणा-या त्याच्या आई वडीलांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान तक्रार दाखल होताच लग्न करून घरी परतलेल्या नवरोबा सिध्दार्थची वरात पोलिसांनी थेट पोलिस ठाण्यात काढीत त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. त्याची आई आणि वडिलांचा पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :marriageलग्नdombivaliडोंबिवली