शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण परिमंडलात वीजबिलाची थकबाकी पोहचली ६०० कोटींवर; 'या' लोकांची वीज कापणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 17:41 IST

महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल थकबाकी तब्बल ६०० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहचली आहे. या थकबाकीसह चालू वीजबिल वसूल करण्यासाठी सध्या व्यापक मोहीम सुरु आहे.

महावितरणच्याकल्याण परिमंडलात वीजबिल थकबाकी तब्बल ६०० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहचली आहे. या थकबाकीसह चालू वीजबिल वसूल करण्यासाठी सध्या व्यापक मोहीम सुरु आहे.

परिमंडलातील वीज ग्राहकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत ७३३ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला. परिमंडलातील इतर ग्राहकांनीही चालू वीजबिलासह थकबाकी भरून कठीण आर्थिक परिस्थितीत महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले. कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीचे जवळपास २६ लाख वीज ग्राहक आहेत.

यातील २ लाख ३२ हजार ग्राहकांनी मार्च २०२० नंतर गेल्या वर्षभरात वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नव्हता. या ग्राहकांकडे २३० कोटी रुपयांची थकबाकी होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्याने पाठपुरावा व विनंती केल्यानंतर यातील १ लाख ५४ हजार ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाचा भरणा एकरकमी अथवा हप्त्याने केला. परंतु अजूनही ७८ हजार ग्राहकांनी वीजबिल भरणे टाळले असून त्यांच्याकडे ७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी चोरून अथवा इतरांकडून वीजपुरवठा सुरु ठेवल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व अनधिकृतपणे वीज देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दहा पथकांची करडी नजर या ग्राहकांवर राहणार आहे.   

फेब्रुवारी महिन्यात ६६० कोटी रुपये चालू वीजबिल व ६७५ कोटी रुपये थकबाकी अशा एकूण १३३५ कोटी रुपयांचा भरणा आवश्यक होता. परंतु तब्बल ६०० कोटी रुपयांच्या थकीत वीजबिलाची अद्याप वसुली होऊ शकलेली नाही. महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन व अखंडित विजेसाठी चालू वीजबिल व थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.२०२ कोटींचा ऑनलाईन भरणा  फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत २०२ कोटी रुपयांचा वीजबिल भरणा ऑनलाईन प्रणालीने झाला आहे. ७ लाख ८० हजार ५०० ग्राहकांनी डिजिटल पेमेन्टचा पर्याय निवडला. कोरोना विषाणूचा पुन्हा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता अधिकाधिक ग्राहकांनी सुलभ असलेल्या डिजिटल माध्यमांचा वापर करून ऑनलाईन भरणा करावा असे सांगण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीelectricityवीज