शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शाळकरी विद्यार्थी नंदन कार्लेने बनविला इको फ्रेंडली डिटर्जंट प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 18:38 IST

बालवैज्ञानिक परिषदेच्या राज्यस्तरीय फेरीसाठी निवड, 22 जिल्ह्यातील 116 प्रकल्पातून 30 जणांची निवड

डोंबिवली: 29 ते 31 जानेवारी या कालावधीत झालेल्या 28 व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेच्या राज्यस्तरीय फेरीत डोंबिवलीच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर या शाळेचा विद्यार्थी नंदन सचिन कार्ले हा पुढील फेरीसाठी निवडला गेला आहे.

यात त्याने सादर केलेला इकोफ्रेंडली डिटर्जंट हा प्रकल्प अव्वल ठरला आहे. यावेळेस ही परिषद आभासी पद्धतीने घेतली गेली.  पहिल्या फेरीत सिनोप्सिस पाठवून प्रकल्पाची निवड केली गेली. नंतर जिल्हा पातळीवर 2 फेऱ्या घेतल्या गेल्या. त्यात ठाणे जिल्ह्यातील 268 बालवैज्ञानिकांनी आपले प्रकल्प व्हिडिओ सादरीकरण तसेच समाज माध्यमांवरील मीटिंग च्या माध्यमातून मांडले. त्यातील केवळ 18 बालवैज्ञानिकांचे प्रकल्प राज्यस्तरीय फेरीसाठी निवडले गेले.

नंतर राज्यस्तरीय फेरीत 22 जिल्ह्यातील 116 संशोधन प्रकल्प सादर झाले. त्यापैकी उत्कृष्ट 30 प्रकल्प यापुढील राष्ट्रीय फेरीकरिता निवडले गेले आहेत. त्यापैकी नंदन कार्लेचा 'इकोफ्रेंडली डिटर्जंट' हा प्रकल्प परीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरला आहे.

त्याचप्रमाणे नंदनचा दुसरा एक प्रकल्प लो कॉस्ट वॉटर प्युटीफायर हा इंस्पायर मानक (Innovation in Science Pursuit for Inspired Research) या भारत सरकारच्या विज्ञान विभागाच्या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय फेरीकरिता पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून विद्यार्थी आपल्या त्यांना सुचलेल्या कल्पना/युक्त्या पाठवतात. त्यापैकी सुमारे 100000 भन्नाट कल्पना ज्या समाजोपयोगी, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर असतील त्या जिल्ह्यास्तरावरील प्रदर्शनासाठी निवडल्या जातात. तिथे विद्यार्थ्यांनी  तयार करून सादर करायचा असतो.

त्यात नंदनने मुख्यत्वे आदिवासी लोकांसाठी किंवा अगदी दुर्गम भागात पोस्टिंग असणाऱ्या सैनिकांसाठी घरच्या घरी तयार करता येणाऱ्या  लो कॉस्ट वॉटर प्युरीफायर' ही संकल्पना मांडली.  यासाठी त्याची महाराष्ट्रातून निवडलेल्या 3139 प्रकल्पात निवड झाली आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी त्याला शाळेच्या विज्ञान शिक्षिका जयश्री दौंड, मुख्याध्यापिका सुलभा बोन्डे, पर्यवेक्षिका विद्या कुलकर्णी तसेच त्याची आई नीलिमा कार्ले यांचे मार्गदर्शन मिळाले.

लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन शाळा, अभ्यास सांभाळून नंदनने या प्रकल्पांवर काम केले आहे.आणि करत आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने हरबल सॅनिटायझर, बायोइंझिम तसेच साबणही तयार केले.  नंदनने याआधीही विविध विज्ञान प्रदर्शने, होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा तसेच काव्यलेखन स्पर्धेत यश मिळवले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीdombivaliडोंबिवली