शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत डंपरची दुचाकीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू

By सचिन सागरे | Updated: June 2, 2024 17:38 IST

डोंबिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या स्नेहा त्यांचे पती सुधीर यांच्यासोबत दुचाकीने पासपोर्ट कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास तेथून परतत असताना सम्राट अशोक चौकात त्यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली. 

डोंबिवली : पश्चिमेकडील सम्राट अशोक चौकात एका डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी रविवारी दुपारच्या सुमारास घडली.  स्नेहा दाभिलकर (५२) असे मयत महिलेचे नाव आहे.

डोंबिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या स्नेहा त्यांचे पती सुधीर यांच्यासोबत दुचाकीने पासपोर्ट कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास तेथून परतत असताना सम्राट अशोक चौकात त्यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली. 

या अपघातात स्नेहा गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे पती सुधीरदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी विष्णूनगर पोलीसानी ट्रक चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.