शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत मेट्रोच्या कामामुळे झाली विद्यार्थ्यांची कोंडी, शाळेचं सत्र करावं लागलं रद्द

By अनिकेत घमंडी | Updated: June 19, 2024 14:55 IST

विद्यानिकेतन शाळेचे दुपारचे सत्र करावे लागले रद्द ट्रॅफिक, आरटीओ, महापालिका यंत्रणा ढिम्म

डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोेंडी होते. याचा नाहक त्रास नागरीकाना सहन करावा लागतो. या वाहतूक काेंडीमुळे डोंबिवलीतील विद्यानिकेतन या शाळेला वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक काेंडीमुळे बुधवारी सकाळच्या सत्रातील मुलांना घेण्यासाठी बस वेळेवर परत न आल्याने शाळेने दुपारचे सत्र ५वी ते ८ वीचे वर्ग बंद करावे लागले. लोकमतने यासंदर्भात शाळा सुरू होण्यापूर्वीच वृत्त देऊन संबंधित यंत्रणांना अवगत केले होते, मात्र तरीही वाहतूक नियंत्रण विभाग, आरटीओ, महापालिका, एमएसआरडीसी या यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचा फटका विदयार्थ्यांना बसला. कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु आहे. या कामामुळे वाहन चालक, स्थानिक नागरीक, रुग्णवाहिका आणि शालेय बसला फटका सहन करावा लगत आहे. वाहतूक विभागाच्या शून्य नियोजनामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. कधी कधी अर्धा तासाच्या प्रवासाला एक ते दोन तास लागतात. या बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला होता.

मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी पर्यायी रस्ते सुरु करावा. अवजड वाहतूक अन्य रस्त्याने वळवा अशी मागणी केली होती. या मागणी दखल प्रशासनाने घेतलेली नाही. प्रशासन अद्याप जागे झालेले नाही. आत्ता तर कल्याण शीळ रस्त्याला लागून असलेल्या विद्या निकेतन शाळेला बुधवारी वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. ही शाळा तीन सत्रात चालते. एक आठ वाजताचे, दुसरे साडे दहाचे आणि पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरीता साडे बारा वाजताचे तिसरे सत्र आहे. बुधवारी वाहतूक कोंडीमुळे दुसऱ्या सत्रासाठी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी गेलेल्या बसेस परतल्या नाहीत. ठिकठिकाणी बसेस वाहतूक काेंडीत अडकल्या होत्या. या बसेस परतणार कधी आणि तिसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांना घेण्याकरीता जाणार कधी असा प्रश्न प्रशासनासमोर होता. शाळा प्रशासनाने तिसरे सत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. वाहतूक कोंडीमुळे शाळा प्रशासनाला आणि विद्यार्थ्यांना सुट्टी घ्यावी लागली. हे सत्र सुट्टीच्या दिवशी चालविले जाईल असे प्रशासनाने सांगितले. मात्र वाहतूक कोंडीमुळे शाळेवर ही वेळ आली आहे. वाहतूक कोंडीचे कारण सांगत डोंबिवली कल्याणकरांना सल्ला दिला आहे की, विविध कामांमुळे वाहतूक कोंडी होणारच. मात्र कल्याण डोंबिवलीकरांनी बेशिस्त वाहने चालविण्याची गरज नाही.  ट्रॅफिक, आरटीओ, महापालिका यंत्रणा काहीच का करत नाहीत, सगळे आपापल्या विषयांत मश्गुल असतात, सामाजिक बांधिलकी आहे की नाहीविवेक पंडित,संस्थापक, विद्यानिकेतन शाळा. 

टॅग्स :kalyanकल्याण