शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीचा नवा स्वंयचलित जिना १५ ऑक्टोबरला सुरू करणार; लोकल फेऱ्याही वाढवणार 

By अनिकेत घमंडी | Updated: September 26, 2023 10:32 IST

प्रवासी संघटनेसमवेत अधिकाऱ्यांची चर्चा

डोंबिवली: ठाणे जिल्ह्याला आगामी रेल्वेच्या वेळापत्रकात जादाच्या लोकलफेऱ्या मिळणार असून लोकमतच्या हॅलो ठाणे कल्याण डोंबिवली पुरवणीत टिटवाळा, बदलापूर मार्गावरील १६ लोकलच्या वेळा बदलणे गरजेचे या मथळ्याखाली मांडलेल्या प्रवाशांच्या व्यथेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. रेल्वे अधिकाऱ्यांनी उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेसमवेत मुंबईत बैठक घेतली, त्यामध्ये हे सकारात्मक आश्वासन दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत नवीन वेळापत्रकामध्ये लोकल ट्रेन संख्या वाढ करणे विचाराधीन आहे, गर्दीच्या वेळी ठाणे - कसारा /कर्जत ट्रेन शटल सर्विस संख्या वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे, डोंबिवली फलाट क्रमांक ३/४ वरील नवीन एक्सेलेटर १५आक्टोबरपासून सुरू करणार. डोंबिवली स्टेशनवर कायमस्वरूपी अँम्ब्युलन्स बाबत चर्चा केल्यानंतर पक्ष/दानशूर संस्था यांच्याकडून अँम्ब्युलन्स भेट देणार्‍यांची संघटनेने माहिती देण्याची विनंती रेल्वे अधिकाऱ्यांनी केली. सद्यस्थितीत १५ डबा ट्रेन तांत्रिकदृष्ट्या वाढविणे शक्य नसल्याने १२ डबा ट्रेन वाढविण्याचे आश्वासन दिले. कसारा स्टेशनवर अजून दोन मेल/एक्सप्रेस थांबा देण्याबाबत आश्वासन दिले आहे.

अपघात रोखण्यासाठी अद्ययावत सिग्नल यंत्रणा संदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. महासंघाकडून फर्स्टक्लास /एसी ट्रेन मध्ये टिसी पाठविण्याची मागणी केली, ती त्यांनी तात्काळ मान्य।केली असून फरक दिसून येईल असे सांगितले. तसेच महिला डब्यांमध्ये व उपनगरीय रेल्वे फलाटावर फेरीवाल्यांना बंदी घालण्याची मागणी केली आहे, त्यावर कार्यवाही होईल असे सांगण्यात आले.कर्जत स्थानकात।देखील मेल।एक्स्प्रेस गाड्या थांबवणेबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संध्याकाळी ठाणे स्टेशनवरून ठाणे ते कर्जत, कसारा तसेच ठाणे ते बदलापूर, आसनगांव, /टिटवाळा ट्रेनची मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :railwayरेल्वे