शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

दिव्यांगांच्या अर्थसाहाय्य वाटपात झाला गैरव्यवहार? केडीएमसीत घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 00:33 IST

KDMC News : दिव्यांगांच्या अर्थसाहाय्य वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत दिव्यांगांनी सोमवारी केडीएमसी मुख्यालयात समाज कल्याण अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी पुरावे सादर करा, चौकशी केली जाईल, असे आश्वासन मनपाने दिव्यांगांना दिले आहे.

कल्याण : दिव्यांगांच्या अर्थसाहाय्य वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत दिव्यांगांनी सोमवारी केडीएमसी मुख्यालयात समाज कल्याण अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी पुरावे सादर करा, चौकशी केली जाईल, असे आश्वासन मनपाने दिव्यांगांना दिले आहे.मनपाकडून दिव्यांग कल्याण व पुनर्वसनांतर्गंत पाच लाखांचा निधी दिव्यांगांना दिला जात होता. हा निधी २०१७-१८ मध्ये ६५ जणांना वाटप केल्याची माहिती दिव्यांग पारसनाथ कौल यांनी माहितीच्या अधिकारात घेतली आहे. त्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की, अर्थसाहाय्य वाटपाच्या यादीत नोकरी करणारे दिव्यांगही आहेत. त्यामुळे खरे दिव्यांग हे अर्थसाहाय्यापासून वंचित आहेत. मनपाने त्यांचे अर्थसाहाय्याचे प्रस्ताव मंजूर न करता नोकरी करणाऱ्या ३० जणांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यामुळे मनपाने अर्थसाहाय्य वाटपात गैरव्यवहार केल्याचा आरोप कौल यांनी केला आहे. कौल यांच्याप्रमाणेच अशोक यादव, ज्योती यादव, कल्पना शिंदे, सतीश शिंदे, भारती शहा हे दिव्यांग खरे लाभार्थी असून तेही लाभापासून वंचित आहेत.मनपाने कौल यांना दिलेल्या माहिती अधिकारातील माहितीत प्रत्येक लाभार्थ्याच्या नावापुढे पाच लाखांऐवजी ५० लाख रुपये, अशी रक्कम वाटप केल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी प्रशासनाने असे सांगितले की, लिपिक महिला आजारी असल्याने तिच्याकडून ही चूक झाली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका