शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नियत साफ असते; दृष्टिकोन साफ असतो तेव्हा धन्याचा धनुभाऊ होतो: धनंजय मुंडे

By प्रशांत माने | Updated: February 27, 2023 00:16 IST

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण यांच्या ३५ व्या वर्धापनदिन कार्यक्रम सोहळयाला धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात मोठे व्हावे हे माझ्या वडीलांचे स्वप्न होते. त्यासाठी माझे वडील चंदनासारखे झीजत राहिले. पण मधल्या काळात घरातून वेगळे झाल्यानंतर विचारधारेतून वेगळे व्हावे लागले. पण विचारधारेतून मी वेगळा झालो नाही मला त्या विचारधारेतून वेगळं केले गेले. त्यानंतर मला समाजाकडून शिव्या पडत होत्या, धण्या शिवाय कोणी नाव घेत नव्हता पण माझी नियत आणि दृष्टीकोन साफ होता. त्यामुळे कालांतराने का होईना धन्याचा धनु भाऊ झाला असा टोला माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांना लगावला.

येथील अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण यांच्या ३५ व्या वर्धापनदिन कार्यक्रम सोहळयाला धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचा मुंडे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान करण्यापूर्वी मुंडे यांनी स्वत: दराडे यांना फेटा बांधला आणि त्यांचा सत्कार केला. मुंडे भाषणात पुढे म्हणाले खडतर परिस्थितीत घरातला एक व्यक्ती मोठा होत असतो त्यासाठी घरातला एक माणूस झीजत असतो. ते झीजण्याचे काम माङया वडीलांनी केले. पण पुढे वेगळे केल्यानंतर समाज माझ्यावर थुंकत होता, शिव्या देत होता. भक्त म्हणून भगवान गडावर गेल्यानंतरही दगड ही खाल्ली. ही अपमानास्पद वागणूक, संघर्ष माझ्या वाटयाला आला. पण भगवंतावर आणि नियतीवर माझा विश्वास होता.  त्यावेळी शरद पवार आणि अजित पवारांनी मोठा आधार दिला.

भगवान गडाचे मठाधिपतीनामी यांना मी सांगितलं होते जोर्पयत मला या ठिकाणी निमंत्रण देणार नाही तोपर्यंत भक्त म्हणून दर्शनाला सुद्धा गडावर येणार नाही पण आज नामदेव शास्त्री बाबांच्या कृपाशीर्वादाने ज्या गडावर मी दगड खाल्ले त्या गडाचा आज मला दगड होता आले याचा मला अभिमान आहे.  स्वकर्तुत्वातून  समाजाला करून दाखविले त्यानंतर आपल्याला ३५ व्या वर्धापनदिनाला का होईना बोलवावे लागले असे मुंडे म्हणाले. त्यांनी भाषणात  वंजारी समाजाला भेडसावणा-या समस्यांबाबतही भाष्य केले. तसेच त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देखील त्यांनी  समाज बांधवांना दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेkalyanकल्याण