शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नव्या पत्रीपुलाचा उतार धोकादायक, डोंबिवलीकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहनचालकांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 23:57 IST

Kalyan : नोव्हेंबर २०१८ला धोकादायक अवस्थेतील जुना पत्रीपूल पाडण्यात आला. आठ महिन्यांत नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागेल असे दावे त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केले होते.

कल्याण : बहुचर्चित नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागल्याने वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका झाली असताना आता नव्यानेच एक समस्या उभी राहिली आहे. या पुलावरील कल्याणच्या दिशेने जाणारा रस्ता उताराचा असल्याने त्यावरून जाताना दुचाकी घसरण्याच्या तसेच अन्य वाहनाला धडकण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत, तर दुसरीकडे लगतच्या पुलावरील डोंबिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे तसेच उंच-सखल भाग असल्याने तेथून जाताना वाहनचालकांना कसरतीचा सामना करावा लागत आहे.नोव्हेंबर २०१८ला धोकादायक अवस्थेतील जुना पत्रीपूल पाडण्यात आला. आठ महिन्यांत नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागेल असे दावे त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केले होते. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे पत्रीपुलाचे काम पूर्ण व्हायला दोन वर्षांहून अधिक कालावधी लागला. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष घातल्याने २५ जानेवारीला त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन  करण्यात आले. नव्या पुलाचे आई तिसाई देवी असे नामकरणही केले असून, तो वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांची कोंडीतून मुक्तता झाली आहे. ही बाब समाधानाची असली तरी कल्याण बाजूकडील उतारावर वाहने वेगाने जात असल्याने अपघाताच्या घटना त्याठिकाणी घडू लागल्या आहेत. उताराच्या ठिकाणी गोविंदवाडी बायपास येथूनही वाहने पत्रीपूल आणि कल्याणच्या दिशेने जात असल्याने त्या चौकात सिग्नल व्यवस्था सुरू करण्याबाबतचे पत्र मनसेचे कल्याण शहर संघटक रूपेश भोईर यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना २९ जानेवारीला दिले आहे. परंतु, अद्याप त्यांच्या पत्राला कोणतेही उत्तर प्रशासनाकडून दिले गेलेले नाही. अशातच आता दुचाकींना अपघात होण्याचे प्रकार वाढत असून, हे प्रकार जीवघेणे असल्याने याची दखल तरी प्रशासनाकडून घेतली जाईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली