शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रवींद्र चव्हाण निवासस्थानी भेट

By अनिकेत घमंडी | Updated: May 2, 2024 17:50 IST

देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी १०: ३० वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चव्हाण कुटुंबियांशी हितगुज केली.

डोंबिवली - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या कल्याणचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्जासाठी गुरुवारी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यायला काहीसा वेळ लागणार होता, त्यामुळे फडणवीस यांनी सकाळी १०: ३० वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चव्हाण कुटुंबियांशी हितगुज केली.

चव्हाण यांनी स्वतः काही फोटो आणि संदर्भ सोशल मीडियावर शेअर केला. चव्हाण यांची मोठी मुलगी राणी ही मेडिकलच्या शेवटच्या वर्षात असून त्या संदर्भात फडणवीस यांनी तिची विचारपूस केली, तसेच लहान मुलगी देखील मेडिकलला असल्याने तिचीही विचारपूस केली. काही विषयांवर चव्हाण यांच्याशी चर्चा करून नंतर ते महायुतीच्या रॅलीत दाखल झाले.ठाणे भाजपला हवे होते, त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा असतानाच फडणवीस आणि चव्हाण यांची डोंबिवलीत येऊन काही वेळ चर्चा झाली त्यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती, परंतु ती केवळ कौटुंबिक भेट होती असे सांगून चव्हाण यांनी महायुतीच्या रॅलीला जाऊ या असे म्हंटल्यावर माध्यमात एकच हशा पिकला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना