शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पीपीई कीट घालून उपचार करताना आम्ही होतो घामाघूम, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 02:11 IST

Coronavirus : कोरोना हा अतिसंसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांवर उपचार करताना, चाचणी घेताना वैद्यकीय डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, रुग्णवाहिकेतील  सेवक, कर्मचारी यांना पीपीई कीट घालून राहावे लागते. तरच त्यांना रुग्णांना हाताळणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांच्या वार्डमध्ये वावरणे शक्य आहे.

- मुरलीधर भवार कल्याण : कोरोना हा अतिसंसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांवर उपचार करताना, चाचणी घेताना वैद्यकीय डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, रुग्णवाहिकेतील  सेवक, कर्मचारी यांना पीपीई कीट घालून राहावे लागते. तरच त्यांना रुग्णांना हाताळणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांच्या वार्डमध्ये वावरणे शक्य आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काळात गतवर्षी पीपीई कीट काही सामाजिक संस्थांकडून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी वर्गास पुरविला जात होते. त्यामुळे पीपीई कीटला बाजारात जास्त मागणी होती. एक पीपीई कीट किमान ८०० रुपयांना मिळते. यापूर्वी सुरुवातीला पीपीई कीटची किंमत जास्त होती. १२०० रुपयांपर्यंत पीपीई कीट बाजारात विकले गेले. महापालिकेच्या रुग्णालयात पीपीई कीट महापालिका प्रशासनाकडून पुरविले जातात. तर, खासगी कोविड रुग्णालयांत रुग्णालय व्यवस्थापनाकडून पीपीई कीट पुरविले जातात. मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्या चांगल्या प्रतीचे पीपीई कीट बाजारात उपलब्ध आहेत. एकदा वापर केल्यावर दुसऱ्या वेळेस त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्यांना रुग्णांच्या बिलात पीपीई कीटचा खर्च समाविष्ट केला जातो. हे सगळे असले तरी आठ तास पीपीई कीट घालून सेवा देणाऱ्यांची चांगलीच दमछाक होते.  चांगल्या दर्जाचे कीट बाजारातरुग्णाला आणून रुग्णालयात भरती करताना रुग्णवाहिकेत ॲटेंडंटचे मी काम करतो. सध्या उन्हाळा आहे. आमची रुग्णवाहिका वातानुकूलित नाही. त्यामुळे पीपीई कीट घालून उन्हातून रुग्णाला रुग्णालयात नेताना घामाघूम होऊन जातो.  मी खासगी रुग्णालयात नर्सचे काम करते. सुरुवातीला आलेले पीपीई कीट हे जास्त दर्जेदार नव्हते. आता चांगल्या दर्जाचे कीट बाजारात आले आहेत. त्यामुळे इतका त्रास जाणवत नसला तरी एक कोंडलेपण सातत्याने जाणवत राहते. सध्या उन्हाळा आहे. कोविड वाॅर्डमध्ये पीपीई कीट घालून वैद्यकीय सेवा देताना घामाघूम होतो. सतत पीपीई कीट घातल्याने डीहायड्रेशनचा त्रास काही जणांना झालेला आहे. कीटसंदर्भात गंभीर तक्रारी आलेल्या नाहीत पीपीई कीट महापालिकेच्या रुग्णालयात महापालिकेकडून पुरविले जाते. पीपीई कीट घालून सेवा देताना काहीअंशी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास होतो. मात्र, संसर्गापासून वाचण्यासाठी कर्तव्य बजावत असताना पीपीई कीट घालण्याशिवाय पर्याय नाही. कीटसंदर्भात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी  अद्याप तरी आलेल्या नाहीत. - डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण