शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: एकाच व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह अन् निगेटिव्ह, दोन अहवालांमुळे झाला संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 03:03 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना चाचणीसाठी गेलेल्या महिलेचा एक अहवाल पॉझिटिव्ह तर दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने या वेगवेगळ्या अहवालांमुळे कोरोनाच्या चाचणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना चाचणीसाठी गेलेल्या महिलेचा एक अहवाल पॉझिटिव्ह तर दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने या वेगवेगळ्या अहवालांमुळे कोरोनाच्या चाचणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, योग्य प्रकारे स्वॅब घेतला न गेल्याने दुसरा रिपोर्ट अहवाल निगेटिव्ह आला असावा, पहिला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संबंधित रुग्ण कोरोनाबाधितच आहे. तिने विलगीकरण होऊन उपचार घ्यावेत, असे केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले.कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे केडीएमसीकडून कोरोना चाचण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील आजदे आरोग्य केंद्रांतर्गत राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेने कोरोनाची लक्षणे असल्याने शनिवारी मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली यात त्यांचा अहवाल आला. मात्र, त्यांनी त्याच वेळी मंजुनाथ आरोग्य केंद्रातही कोरोनाची चाचणी केली. यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. हे दोन्ही अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाचणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. मात्र रुग्णांनी पुन्हापुन्हा चाचण्या केल्यापेक्षा तत्काळ विलगीकरण होऊन कोरोनाचे संक्रमण थांबवावे असे पालिकेने स्पष्ट केले आहे.पाॅझिटिव्ह अहवाल खरास्वॅब योग्य प्रकारे न घेतल्याने अहवाल निगेटिव्ह आला असावा. परंतु, पॉझिटिव्ह आल्यावर पुन्हा चाचणी करणे कितपत योग्य आहे? ॲण्टीजेन चाचणी निगेटिव्ह येते, तेव्हा आरटीपीसीआर करण्यास सांगतो. निगेटिव्ह अहवाल खोटा असू शकतो, परंतु पॉझिटिव्ह येतो तेव्हा तो खराच असतो, असे केडीएमसीच्या डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या