शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

coronavirus: डोंबिवलीत कोविड सेंटरमध्ये ‘शिमगा’, सेंटर परिसरात दारू, गांजा पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 02:27 IST

Coronavirus in Dombivali : होळीच्या पूर्वसंध्येला, शनिवारी डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड सेंटरमधील कर्मचारीच सेंटर परिसरात दारू, गांजाची पार्टी करीत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

कल्याण : कोविड सेंटरमधील रुग्णांच्या वस्तू चोरीस जाणे, महिलांचा विनयभंग होणे या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र होळीच्या पूर्वसंध्येला, शनिवारी डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड सेंटरमधील कर्मचारीच सेंटर परिसरात दारू, गांजाची पार्टी करीत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दारू, गांजा पिण्यास मज्जाव करणाऱ्या तरुणाने त्यांचा व्हिडिओ काढला. त्या रागातून कर्मचाऱ्यांनी त्या तरुणालाच बेदम मारहाण केली. दरम्यान, दारू, गांजा पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड सेंटर मनपाने एका कंत्राटदारास चालविण्यास दिले आहे. या सेंटरनजीक तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या एका शेडमध्ये काही कर्मचारी दारू, गांजा पार्टी करीत असल्याची बाब राजू आलम या तरुणाच्या लक्षात आली. राजू हा एसी दुरुस्तीचे काम करतो. त्याने कर्मचाऱ्यांना मज्जाव केला. ते दाद देत नसल्याने त्याने त्यांचा व्हिडिओ काढला. त्यामुळे त्यांनी राजूलाच बेदम मारहाण केली. ही बाब कळताच कोविड सेंटर प्रशासनाने दारू, गांजा पिणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र, कोविड सेंटर परिसरात गैरप्रकार घडत असल्यास तो रोखण्याची जबाबदारी मनपाच्या सुरक्षायंत्रणेची आहे. कामाची वेळ संपल्यावर कर्मचाऱ्यांना आवाराच्या बाहेर काढले जाते, असे सेंटर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.याबाबत मनपाच्या आरोग्य विभागाने खुलासा केला आहे की, हे कर्मचारी कंत्राटदाराचे आहेत. मनपाशी त्यांचा संबंध नाही. संबंधित कर्मचाऱ्यांची ड्युटी संपली होती. हा प्रकार रुग्णालयाच्या मागच्या बाजूस घडला आहे. याबाबत कोविड सेंटर चालकास समज देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेले निर्बंध, नियम शहापूर तालुक्यातील हॉटेल, रिसॉर्ट, दुकानदार यांनी पाळून प्रशासनास सहकार्य करावे. जनसामान्यांनीही मास्कचा वापर करावा. गर्दी करणे टाळावे. नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूर  १०० हून अधिक हाैशींनी केली होळीच्या पार्टीला गर्दी, तहसीलदारांची कारवाई कसारा : कोरोनाचे नियम पायदळी तुडवत होळी पार्टीसाठी शंभरहून अधिक जणांची गर्दी जमवल्याप्रकरणी शहापूर तालुक्यातील खातीवली येथील सृष्टी फार्महाऊसवर शहापूरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी पथकाला उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच मास्कचा वापर न केल्याचे आढळून आले. त्यामुळे फार्महाऊस मालकाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. सरकारने हॉटेल, रिसॉर्ट, विवाह कार्यालय, धार्मिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणी कडक निर्बंध घातले आहेत. असे असतानाही शहापूर तालुक्यातील खातीवली वाशिंद येथील व भातसा नदीपात्रालगत असलेल्या सृष्टी फार्महाऊसवर रविवारी होळी पार्टीसाठी शंभरहून अधिक जणांनी गर्दी केली होती. त्यांनी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पायदळी तुडवले होते. ही बाब निदर्शनास येताच तहसीलदारांच्या पथकाने छापा टाकला. पुन्हा नियम मोडल्यास सील लावण्याचा इशारा फार्महाऊसच्या मालकास ५० हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापुढे नियमबाह्य काम केल्यास फार्महाऊसला सील लावण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या पथकात नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, तलाठी रूपेश मेरठ, मिलिंद राऊत सहभागी झाले होते. दरम्यान, तहसीलदारांच्या धडक कारवाईमुळे हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊस, चालकांचे धाबे दणाणले आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण