शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मद्यविक्रीसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा आधार; विक्रेत्यांनी लढवली अनोखी शक्कल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 21:10 IST

CoronaVirus News : काही विक्रेत्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मद्याची ऑर्डर स्वीकारून घरपोच सेवा देण्याचा नवा फडा अंमलात आणला आहे.

ठळक मुद्देजास्त ऑर्डर असल्यास फ्री होम डिलिव्हरीचा पर्याय देण्यात आला असून कमी जास्त अंतरानुसार होम डिलिव्हरीचे पैसे आकारले जात आहे

- मयुरी चव्हाण 

कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत सोमवारी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश असतानाही अनेक वाईन शॉपमधून मद्य विकले जात असल्याचे दिसून आले.  होळीचे जोरदार सेलिब्रेशन करण्यासाठी मद्यपींनी दुकानाबाहेर एकच गर्दी केली होती. काही वाईन शॉपीवर कारवाई करण्यात आली असली तर सुट्टीच्या दिवशी गर्दीला आवर घालायचा कसा? असा प्रश्न मद्य विक्रेत्यांना पडला आहे. यावर उपाय  म्हणून कल्याण डोंबिवलीतील काही विक्रेत्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मद्याची ऑर्डर स्वीकारून घरपोच सेवा देण्याचा नवा फडा अंमलात आणला आहे. (WhatsApp support for alcohol sales, ideas by vendors)

शनिवारी आणि रविवारी मद्याला सर्वाधिक मागणी असते. त्यात होळी असल्याने  आपला खिसा गरम करण्यासाठी सोमवारी दुकानं बंदचे निर्देश असूनही विक्रेत्यांनी मद्य विकले. तर दारूसाठी काय पण असे म्हणत मद्यपींनी सुद्धा दुकानाभोवती एकच गर्दी केली होती. या आठवड्याच्या आकडेवारीचा अंदाज घेत येणाऱ्या काळात अधिक कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या धंदा तेजीत राहावा म्हणून वाईन शॉप मालकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून जाहिरात करायला सुरुवात केली आहे. ऑर्डर दिल्यावर ग्राहकाला घरपोच सेवा दिली जात आहे. जास्त ऑर्डर असल्यास फ्री होम डिलिव्हरीचा पर्याय देण्यात आला असून कमी जास्त अंतरानुसार होम डिलिव्हरीचे पैसे आकारले जात आहे. 

दरम्यान, गेल्या वर्षी मद्यविक्रेत्यांनी हिच शक्कल लढवत व्यवसाय सुरू ठेवला होता. आता सुट्ट्यांच्या दिवशी होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा  व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतला जात आहे. तर काहींना ऑनलाइन फसवणूक होण्याची भीती वाटत आहे. कारण, गेल्यावर्षी ऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली पूजा वाईन शॉपीने अनेक मद्यपींची फसवणूक झाली होती. अनेकांनी ऑनलाईन पेमेंट करूनही त्यांना मद्य मिळाले नव्हते. मात्र, आता मद्याची डिलिव्हरी मिळाल्यावरच रोख रक्कम  ग्राहकांकडून घेतले जात आहे.

मद्यप्रेमींचा चांगला प्रतिसादव्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून होम डिलिव्हरी मागील वर्षी कोरोना संकट काळातही दिली होती. यामुळे आता सुद्धा होम डिलिव्हरी सुरु केल्यामुळे आम्हालाही गर्दी टाळता येणे शक्य होणार आहे. ग्राहकांचाही होम डिलिव्हरीच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे ठाकुर्ली येथील एका वाईन शॉप मालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

फेक वाईन शॉपीवाल्यांकडून सावधान!माझ्या एका मित्राने 900 रुपये मद्यासाठी गुगल पे वरून एका फेक वाईन शॉप वाल्याला दिले होते. मात्र अजून त्याला मद्य मिळाले नसून त्याचा नंबर ब्लॉक करण्यात आला आहे. याबाबत मित्राने माहिती देऊन इतरांनाही फेक वाईन शॉपीवाल्यांकडून सावध करण्याचा सल्ला दिला आहे, असे तुषार साटपे या तरुणाने सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस