शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मुंबईच्या उंबरठ्यावर आणखी एक मोठं संकट; दोन मृत्यूंमुळे एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 21:05 IST

CoronaVirus News: कल्याण डोंबिवलीमध्ये म्युकरमायकोसिसचे दोन बळी; केडीएमसी प्रशासनाचा दुजोरा, मात्र रुग्णालयाची चुप्पी

- मयुरी चव्हाणकल्याण: कोरोना आजाराबाबत नवीन लक्षण समोर येत असून  यामध्ये आता कोरोनाग्रस्तांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराला सामोरं जावं लागत आहे.  राज्यात आतापर्यंत या आजारामुळे 8 लोकांचा बळी  गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश  टोपे  यांनी नुकतीच दिली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातदेखील म्युकरमायकोसिसमुळे  दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी एक रुग्ण केडीएमसी हद्दीतील असून दुसरा रुग्ण हा कल्याण ग्रामीण परिसरातील आहे. या वृत्तास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानेदेखील दुजोरा दिला आहे. डोंबिवलीमधील एका खाजगी रुग्णालयात या  दोंघांवर उपचार सुरू होते. मात्र यासंबंधी खाजगी रुग्णालयाने बोलण्यास टाळाटाळ केली आहे. VIDEO: कहाँ से आते है ये लोग? बंद शटर उघडताच लागली रांग; पोलिसांनी मारला डोक्यावर हातकल्याण डोंबिवलीच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्येही या आजाराने शिरकाव केल्याचे दिसून येते. कोरोनामुक्त झाल्यानंतर डायबेटिस असलेल्या रूग्णांना हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे समोर आले आहे. डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात या दोन्ही मृत व्यक्तींवर उपचार सुरू होते. दोघेही पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे ३८ व ६९ अशी आहेत.  एम्स रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या एकूण सहा व्यक्तींवर उपचार सुरु असल्याची माहिती  केडीएमसीचे  वैद्यकीय  अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांनी लोकमतशी बोलताना   दिली आहे. तसेच रुग्णालयाने पाठवलेल्या अहवालातील डेथ सर्टिफिकेटवर  मृत्यूचे कारण म्युकरमायकोसिस असे नमूद केल्याचेही सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. ...तर देशात कोरोनाचे अधिक घातक स्ट्रेन तयार होण्याची भीती; शास्त्रज्ञ चिंतेतयासंदर्भात एम्स रुग्णालय प्रशासनाशी वारंवार संपर्क साधण्याचा  प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. इतकेच नाही तर रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी हॉस्पिटलच्या आवारात गेले असता  यावर कोणतेही  भाष्य करण्यास रुग्णालय प्रशासन तयार नव्हते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रूग्णांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येत आहे. एम्स हॉस्पिटल येथे 6 रूग्ण म्युकरमायकोसिस आजारावर उपचार घेत  असून दोघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक रुग्ण कल्याण डोंबिवली परिसरातील असून दुसरा ग्रामीण भागातील आहे. डायबेटीसच्या रुग्णांना या आजराचा संसर्ग लवकर होऊ शकतो त्यामुळे अशा रूग्णांनी शुगर लेव्हल मेंटेन करणं आवश्यक आहे. कोणीही घाबरून जाऊ नये.  कोरोनसोबत या आजारावरदेखील उपचार केले जाणार आहे. - डॉ अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय  अधिकारी 

सर्वेक्षण करणं गरजेचंकल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत  असणारं  कोविड सेंटर आणि व  खाजगी कोविड रुग्णालयात म्युकरमायकोसिस या आजाराचे एकूण किती रुग्ण दाखल आहेत त्यांच्यावर कसे आणि काय उपचार केले जात आहेत, याची माहिती केडीएमसी प्रशासनाने  ठेवणे आवश्यक आहे. यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाला विचारणा केली असता अद्याप रुग्णालयांकडून यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता खाजगी रुग्णालयांना  कोरोना संदर्भातील सर्व माहिती वेळेत देण्यासाठी प्रशासनाने कडक शब्दांत समज देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या