शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: होम क्वारंटाइन रहिवाशांवर आता पोलीस ठेवणार नजर, केडीएमसीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 03:16 IST

coronavirus in KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना होम क्वारंटाइन केलेले बरेच जण मोकाट फिरताना दिसत आहेत.  यामुळे त्यांना वेसण घालून कोरोनास रोखण्यासाठी होम क्वारंटाइन असलेल्यांची यादी पोलीस ठाण्यात देण्यात येणार आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना होम क्वारंटाइन केलेले बरेच जण मोकाट फिरताना दिसत आहेत.  यामुळे त्यांना वेसण घालून कोरोनास रोखण्यासाठी होम क्वारंटाइन असलेल्यांची यादी पोलीस ठाण्यात देण्याबरोबरच त्यांच्या घरावर होम क्वारंटाइनचे स्टिकर्सही लावले जाणार आहे. यामुळे होम क्वारंटाइन असलेली व्यक्ती मोकाट फिरताना दिसल्यास त्याविरोधात पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.   होम क्वारंटाइन केलेले अनेक जण मोकाट फिरताना दिसतात, असे सांगून त्यांच्याविरोधात पोलिसांकरवी कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले होते. मात्र, आता त्याचे पुढचे पाऊल म्हणजे होम  क्वारंटाइन असलेल्यांची यादीच पोलिसांच्या हाती दिली जाणार आहे. सध्या महापालिकेने १४ दिवसांकरिता एक लाख ८३ हजार ८८५ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत एकूण १५ लाख १० हजार २२३ जणांना होम क्वारंटाइन केले असून यापैकी १३ लाख ३२६ जण क्वारंटाइनमुक्त झालेले आहेत.  रोज ७०० जणांची चाचणीकल्याण रेल्वेस्थानकात बाहेरगावाहून येणा-या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. २४ तास त्याठिकाणी चाचणी पथक तैनात आहे. रोज किमान ७०० प्रवाशांची चाचणी केली जात आहे. त्याठिकाणी लॅब टेक्निशियन असतो.  मात्र, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला रुग्णवाहिका नेण्यास आली नाही, म्हणून एका रुग्णाने पलायन केले होते. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने त्याठिकाणी रुग्णवाहिका तैनात केली आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त नसतो. पॉझिटिव्ह आलेले काही रुग्ण हे भिवंडीचे होते, असे डॉ. पानपाटील यांनी सांगितले.  महापालिका हद्दीत आता कोरोना डबलिंगचा रेट ६० दिवसांचा आहे. रुग्णांच्या मृत्यूचा दर १.५७ टक्के आहे.  गेल्या १५ दिवसांत कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झालेला आहे.  तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.३८ टक्के इतके आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका