शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: डोंबिवलीत कर्फ्यूच्या रात्रीच लग्न सोहळा, वधू वर पित्याच्या विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 15:00 IST

राज्य सरकारने कालपासून रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत कफ्यरू लागू केलेला असताना डोंबिवली कोळेगावात एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नाला १५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमविण्यात आली होती.

कल्याण - कल्याण डोंबिवली कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने विविध र्निबध लागू केले असले तरी नागरीकांकडून नियमांना हरताळ फासला जात असल्याची आणखीन एक घटना समोर आली आहे. राज्य सरकारने कालपासून रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत कफ्यरू लागू केलेला असताना डोंबिवली कोळेगावात एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नाला १५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमविण्यात आली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी वधू वर पिता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या ई प्रभागाचे प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कोळेगाव येथील सेंटमेरी शाळेच्या मोकळ्य़ा मैदानात नांदिवली येथील नामदेव सखाराम पाटील यांच्या मुलाच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी प्रभाग अधिकारी पवार यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता लग्न कार्याला १५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमविली असल्याचे दिसून आले. त्याठिकाणी सोशल डिस्टसिंगचे  पालन आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आलेला नव्हते. मानपाडा पोलिसांनी नामदेव पाटील यांच्यासह वधू पिता शंकर जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोनच दिवसापूर्वी शिवसेना नगरसेवकाने त्याच्या मुलीच्या लग्न सोहळ्य़ात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असताना आत्ता कोळेगावातील लग्न सोहळ्य़ात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. महापालिका आयुक्तांनी कालच पोलिस प्रशासनासोबत बैठक घेऊन सरकारी र्निबधांची कडक अंमलबजावणी करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर लग्न सोहळे आयोजित करणारी मंगल कार्यालये आणि भाजी मंडईवर विशेष लक्ष राहणार असल्याचे सांगितले होते.

लोढा परिसरातील आठ दुकांनाना ठोकले सीलआजपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिल रोजीर्पयत बंद राहणार आहेत. हा आदेश न जुमानता लोढा परिसरातील आठ दुकानदारानी दुकाने उघडली होती. ही बाब लक्षात येताच प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी त्याठिकणी धाव घेऊन आठ ही दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका