शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Kalyan-Dombivali : मोकाट फिरणारे कोरोना रुग्णांचे नातेवाईक आणि होम आयसोलेटवर पोलिसांची राहणार नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 16:29 IST

Corona Virus in Kalyan-Dombivali: आयुक्तांची कोरोना संदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पार पडली. या बैठकीस पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे देखील उपस्थित होते.

ठळक मुद्देपाच दिवस पुरेल इतका लसीचा साठा महापालिकेकडे आहे. उद्या ३१ मार्च रोजी नव्याने लसीचा साठा उपलब्ध होणार आहे.

कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहे. तरी देखील कोरोना रुग्णांचे नातेवाईक आणि होम आयसोलेशन असलेले अनेक जण शहरात मोकाट फिरत असल्याचे चित्र आहे. हे रुग्ण ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीला पोलीस फोन करुन ताकीद देणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. (Corona Virus in Kalyan-Dombivali: police will keep an eye on the relatives of the corona patients and home isolate patients!)

आयुक्तांची कोरोना संदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पार पडली. या बैठकीस पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे देखील उपस्थित होते. बैठकीपश्चात ही माहिती आयुक्तांनी दिली आहे. आयुक्तांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादूर्भाव मागच्या वर्षी वाढला होता. त्यावेळी प्रत्येक वार्डात कोरोना नियंत्रण समिती नेण्यात आली होती. त्यामध्ये विद्यमान नागरसेवक होते. त्यात आत्ता माजी नगरसेवकांचाही सहकार्य घेऊन कोरोना नियंत्रणात आणण्याकरीता त्यांची मदत घेतली जाईल.

कोरोना लसीकरणाची सेंटर वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. लसीकरण केंद्रे वाढविण्यासंदर्भाता आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार पाटीदार भवन येथील कोविड सेंटर येथे आणि दोन आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरातील जी खाजगी रुग्णालये मोफत लसीकरण करण्यास तयार आहे. त्यांना लसीकरण केंद्रे सुरु करण्यास परवानगी देण्याचा विचार करण्यात येणार आहे.

पाच दिवस पुरेल इतका लसीचा साठा महापालिकेकडे आहे. उद्या ३१ मार्च रोजी नव्याने लसीचा साठा उपलब्ध होणार आहे. लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.

शिष्ट मंडळाच्या माध्यमातूनही मागणी करता आली असतीडोंबिवलीत व्यापाऱ्यांनी केडीएमसी निर्बंधाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. एक दिवसाची शिथिलता हवी होती. त्यानुसार त्यांना एक दिवसाची शिथिलता दिली होती. व्यापाऱ्यांची जबाबदारी होती, त्यांना कोरोनाचे नियम पाळले पाहिजे होते. रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यापेक्षा शिष्ट मंडळाच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी करता आली. नियम मोडले म्हणून १२५ व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. केलेली कारवाई ही योग्य असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

काही दुकानदारांनी कोरोना नियमवलीचा भंग केलाशिथिलता देऊन देखील काही दुकानदारांनी कोरोना नियमवलीचा भंग केला आहे. तसेच दारुची दुकाने उघडी होती. नियम पाळले गेले नाही. उत्पादन शुल्क विभागाकडून दारुच्या दुकानदारांना सूचित केले गेले नसल्याची बाब समोर येत असल्याने त्यांना यापूढे सूचित केले जाईल. मात्र साथ रोग नियंत्रणात एका विशिष्ट यंत्रणो करीता नियम काढता येत नाही. काढलेले आदेश हा सगळ्य़ांनाच लागू असतो असे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली