शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Corona vaccine: लस संपल्याने नागरिक संतापले, कूपनचा काळा बाजार होत असल्याचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 15:05 IST

Corona Vaccine In KDMC:

कल्याण- गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली शहरातील लसीकरण केंद्र  वारंवार बंद ठेवावी लागत आहेत. एकीकडे राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून दोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी केडीएमसीच्या कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर आज तोबा गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. विशेष बाब म्हणजे जवळच केडीएमसीचे मुख्यालय असून सुद्धा कोणी अधिकारी या  ठिकाणी  फिरकले नाही. (Citizens angry over vaccine depletion, allegations of coupon black market)

केडीएमसी प्रशासनाकडून किंवा ज्या खासगी एजन्सीला लसीकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन  गेले नसल्याने  काही नागरिक केडीएमसी मुख्यालयावर धडकले होते. बुधवारी नागरीकांच्या सहनशीलतेचा अंत झालेला पाहायला मिळाला. एकीकडे खाजगी वाहन परवडत नसल्यानं लोकल प्रवासासाठी नागरीकांची धडपड तर दुसरीकडे लसींचा दुसरा डोस मिळवण्यासाठी  करावा लागणारा संघर्ष या  गोष्टीमुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक अक्षरशः हतबल झालेले पाहायला मिळाले. यावेळी कुपनचा काळा बाजार होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

काल रात्रीपासून आचार्य अत्रे रंग मंदिराबाहेर नागरीक रांगेत उभे होते. जवळपास दोन किलोमीटर पर्यंत ही रांग पोहचली होती. पहाटे 3 वाजल्यापासून रांगेत उभे राहूनही लसीचे टोकन न मिळाल्याने  नागरिक चांगलेच संतापले होते. सोनाली पाठारे या तरुणीने लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळाले. तसेच कुपन वाटण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत एवढ्या लवकर कुपन कसे काय संपले असा संतप्त सवाल उपस्थित केला.  नागरीकांचा संताप पाहता पोलिसांना घटनास्थळी दाखल व्हावं लागले. " वरातीमागून घोडे" या  उक्तीनुसार गर्दी ओसरल्यावर  व  गोंधळ शांत झाल्यावर   पालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडून नागरिकांना योग्य त्या सूचना दिल्याचे आणि कुपन व्यवस्थितपणे वाटले गेल्याचा दावा करण्यात आला.

राज्य सरकारने लोकल प्रवासाबाबत महत्वपूर्ण घोषणा  केल्यानंतर  कल्याण डोंबिवलीमध्ये लसीसाठी गर्दी उसळणार ही बाब स्पष्ट होती. मात्र, कोणतंही नियोजन प्रशासनाकडून केलं गेलं नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यापूढे तरी  प्रशासन  यातून काही धडा घेणार का? हा देखील एक प्रश्नच आहे.             आपल्याला काही वेळापूर्वीच या गोंधळाची माहिती समजली. एकंदर परिस्थिती पाहता यापूढे आता केडीएमसीचा एक अधिकारी नियुक्त केला जाईल. तसेच नागरिकांना सूचना देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल       - उपायुक्त डॉ. पल्लवी भागवत

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याण