शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Corona Vaccination: लसीकरणासाठी अभिनेत्यांची जिल्हा रुग्णालयाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:08 IST

अशोक समेळ यांनी सपत्नीक घेतली लस

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोविडच्या काळात सर्वसामान्य रुग्णांसह मराठी अभिनेते, शासकीय अधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर या रुग्णालयात मिळणाऱ्या आपुलकीच्या वागणुकीमुळे आणि योग्य उपचार पद्धतीमुळे चांगलेच पसंतीस उतरले होते. आता लसीकरणासाठीदेखील सर्वसामान्य नागरिकांसह मध्यमवर्गीय यांच्यापाठोपाठ मराठी अभिनेत्यांनीदेखील हजेरी लावून त्यावरील आपले प्रेम कायम ठेवले आहे. त्यानुसार सोमवारी ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अशोक समेळ यांनी सपत्नीक, तर मराठी अभिनेते अभिजित चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन लसीकरण करून घेतले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.जिल्हा समान्य रुग्णालयात योग्य उपचार मिळतील का, तेथील कर्मचाऱ्यांकडून नीट वागणूक मिळेल का, अशा अनेक शंका उपस्थित करून नकारात्मक दृष्टीने जिल्हा रुग्णालयाकडे पहिले जात होते. मात्र ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड १९ रुग्णालयात रूपांतर केले. त्या दिवसापासून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातील डॉक्टर्सपासून ते सफाई कर्मचाऱ्यांकडून आपुलकीने व माणुसकीच्या नात्याने करण्यात येणारी विचारपूस, त्यांना देण्यात येणारे उत्तम जेवण, नास्ता आदी बाबींची घरच्या प्रकारे काळजी घेत, असल्यामुळे हे रुग्णालय अल्पावधीतच सर्वसामान्यांपासून ते उच्च पदस्थ अधिकारी आणि मराठी सिनेअभिनेत्यांच्यादेखील पसंतीस उतरले आहे. त्यात या रुग्णालयात मागील वर्षी अभिजित केळकर या अभिनेत्याने कोरोनाची लागण झाल्यानंतर दाखल होऊन येथील उपचाराचे कौतुक केले. दरम्यान, आता याच रुग्णालयात लस घेण्यासाठी कलाकारांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. सुटीच्या दिवशीही मिळाला लसीकरणाला चांगला प्रतिसाद आता, जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रात ४५ वर्षीय व्याधीग्रस्तांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी पसंती देऊन लसीकरण केले. त्यात शनिवारी ३५०, तर रविवारी सुटीच्या दिवशी १४९ जणांनी लसीकरण केले. त्यानंतर सोमवारी ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अशोक समेळ व त्यांच्या पत्नी संजीवनी समेळ यांनी लसीकरण करून घेतले, यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र, नाटककार संग्राम समेळ व जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवारदेखील उपस्थित होते, तर दुसरीकडे मराठी अभिनेते अभिजित चव्हाण यांनीदेखील सोमवारी जिल्हा रुग्णालयात हजेरी लावून लसीकरण करून घेतले.काेविड रुग्णालयांतील उपलब्ध बेडहाॅस्पिटल    एकूण बेड        उपलब्धठाणेजिल्हा रुग्णालय (शासकीय)    २००        २०ग्लोबल (टीएमसी)    १०००          १०२पार्किंग प्लाझा (टीएमसी)    ३००        ००कौशल्या हाॅस्पिटल (खासगी)    ७०        ००वेदांत, जीबी, रोड (खासगी)    ७०         ००मेट्रो पोल     ६०        ००कल्याण-डोंबिवलीआयकॉन हाॅस्पिटल     ३९        ००आयुष हाॅस्पिटल     ४०        ०१    मीरा हाॅस्पिटल     ४०        ००ऑप्टीलाइफ हाॅस्पिटल    २२        २१भिवंडीअल हज शाह मोहम्मद रुग्णालय     १००        २३स्वराज जननी हॉस्पिटल     १३          ११लाइफ लाइन वाघमारे हॉस्पिटल                 २५        २१मढवी हॉस्पिटल    २५          २५ खातून बी काझी हॉस्पिटल     १४        ०२अल मोमीन हॉस्पिटल     ३०          ३०

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस