शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नागरिकांनी ऑनलाइन कामे करावी, केडीएमसी आयुक्तांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 05:52 IST

महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये या ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता हे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. अत्यावश्यक कामकाज या आदेशातून वगळण्यात आले आहे.

 कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच महापालिका मुख्यालय किंवा अन्य प्रभाग कार्यालयांत यावे. अन्यथा ऑनलाइन, ई-मेल आणि मोबाइलचा वापर करून महापालिकेशी संबंधित कामे  करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी काढले आहेत. महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये या ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता हे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. अत्यावश्यक कामकाज या आदेशातून वगळण्यात आले आहे. अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांना काही अत्यावश्यक काम असल्यास त्यांनी प्रथम मोबाइलवरून संपर्क साधावा. त्यानंतरच प्रभाग अधिकारी कार्यालयात भेटीसाठी यावे. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे की नाही, याची जबाबदारी सुरक्षारक्षक आणि अधिकारी वर्गाची राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याविरोधात सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.नागरिकांनी महापालिकेच्या वेबसाइटवर संबंधित अधिकारी आणि विभागास ई-मेल करावा. अत्यंत तातडीचे टपाल आणि मेसेज ई-मेलद्वारे पाठविले जावेत. महापालिका मुख्यालयात दैनंदिन टपाल आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सिस्टीम मॅनेजर यांनी नागरी सुविधा केंद्रात टपाल स्वीकारण्याची सुविधा करावी. नागरिकांचा भेटीचा दिवस तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. महापालिकेचा कर आणि अन्य देय रकमा भरण्यासाठी नागरिकांनी डिजिटल सेवेचा वापर करावा. महापालिका कार्यालयात होणाऱ्या बैठका अत्यावश्यक असतील तर त्या आयोजित कराव्यात. अशा बैठकांना महापालिकाबाहेरील अधिकारी, कर्मचारी, खासगी व्यक्तीना आमंत्रित करण्यात येऊ नये, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाonlineऑनलाइन