शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गटार सफाई दरम्यान कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By मुरलीधर भवार | Updated: June 22, 2023 20:18 IST

मृत्यूस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कारवाई होणार का ?

कल्याणशहराच्या पूर्व भागातील तिसगाव गावठाण परिसरातील सिंकदर का’लनीनजीक असलेल्या गटारीची सफाई करीत असतान कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव ऋतिक कुरकुटे (२२) असे आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ऋतिक हा कसारा नजीकच्या कारेगावचा राहणारा होता.

महापालिकेने लहान गटारी स्वच्छ करण्याची कामे कंत्राटी पद्धतीने दिलेली आहेत. सकाळी सात ते दुपारी २ या वेळेत कंत्राटी कामगारांकडून गटारींची सफाई करुन घेतली जाते. ऋतिक आज कामावर आला होता. दुपारी तो गटार साफ करीत असताना त्यांच्या जोडीला अन्य एक सहकारी कामगार होता. त्याठिकाणी एका नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीचे काम सुरु आहे. तसेच नजीकच चाळी आहे. त्याठिकाणी गटारीत सफाई करीत असलेल्या ऋतिकला विजेचा तारेचा धक्का लागला. त्यावेळी ऋतिकने आवाज केला.

त्याला वाचविण्यासाठी त्याचा सहकारी कामगार पुढे सरसावला. मात्र त्याला वाचविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. ऋतिक जागीच मरण पावला होता. ऋतिकचा ज्या वीजेच्या तारेमुळे मृत्यू झाला. ती वीजेची तार बिल्डरची होती की नजीकच्या चाळ धारकांची होती. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करुन कंत्राटी कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या विरोधात ठाेस कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :kalyanकल्याणDeathमृत्यू