शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस शासनाच्या दबावाखाली पण काँग्रेस मिळवून देईल न्याय; पटोलेंनी घेतली पिडीतेची भेट

By प्रशांत माने | Updated: June 21, 2023 20:12 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते.

डोंबिवली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्याला भेट देऊन नंदू जोशी विनयभंग प्रकरणातील पिडीतेची भेट घेऊन तिच्याशी चर्चा केली. पोलिसांवर शासनाचा दबाव आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक होत नाही पण काँग्रेस पिडीत महिलेला न्याय मिळवून देईल असे प्रतिपादन पटोले यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.

भाजपचे पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या दाखल गुन्हयाचे तीव्र पडसाद भाजपसह शिवसेनेच्या राजकारणात उमटले आहेत. भाजपने जोशी यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्हयाच्या विरोधात पोलिस ठाण्यावर मोर्चा देखील काढला होता. दरम्यान काँग्रेसने आरोपीला तत्काळ अटक करा अशी मागणी लावून धरली असून बुधवारी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पिडीतेची भेट घेतली. शासनाचा पोलिस विभागावर असलेला दबाव आम्ही बघतोय, ठाणे जिल्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. भाजप विरूध्द शिंदे गट या लढाईत पोलिसांवर जो दबाव आहे तो ख-या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला न भूषविणारा आहे. एक अबला महिला न्यायासाठी पोलिस ठाण्याच्या बाहेर उपोषणाला बसली आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला पकडले जात नाही, चौकशी केली जात नाही. त्यामुळे पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे हा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे असे पटोले म्हणाले. पक्षाचा विधी व न्याय सेल घेणार दखलकाँग्रेस पक्षाचा विधी व न्याय सेल आहे. त्याचे वकील गुरूवारी पिडीत महिलेची भेट घेतील आणि तिने केलेल्या तक्रारीचा एफआयआर घेतील. न्यायालयातून पीडितेला न्याय मिळवून देण्याची भुमिका आम्ही घेतली असल्याकडे पटोले यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीNana Patoleनाना पटोले