शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

KDMC Budget 2022: आरोग्यम् धनसंपदेचा निर्धार! केडीएमसीचा १७७३.५६ कोटींचा अर्थसंकल्प; कर, दरवाढ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 11:06 IST

KDMC Budget 2022: कल्याण-डोंबिवली मनपाचा २०२२-२३ वर्षाचा १,७७३ कोटी ५६ लाख रुपये जमेचा, तर १,७७२ कोटी ५० लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सादर केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचा २०२२-२३ वर्षाचा १,७७३ कोटी ५६ लाख रुपये जमेचा, तर १,७७२ कोटी ५० लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प शुक्रवारी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सादर केला. तसेच त्यांनी त्यांच्या अधिकारात त्याला तत्काळ मंजुरीही दिली. विशेष म्हणजे, या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणतीही कर दरवाढ लादलेली नाही. मात्र, येत्या वर्षातही आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

आरोग्यासाठी ४३ कोटींची तरतूद केली आहे. कल्याण पश्चिमेला १००, तर डोंबिवलीत ५० खाटांचे प्रसूतीगृह सुरू केले जाणार आहे. टिटवाळा येथे सामान्य रुग्णालय, तर कल्याणमध्ये  मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू केले जाईल.  शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयात १० आयसीयू, नवजात बालकांसाठी १० खाटांचे एनआयसीयू सुरू करण्यात येईल.

अल्प दरात सोनोग्राफी

एमआयआर, सीटीस्कॅन, सोनोग्राफी, पॅथोलॉजी लॅब तयार केली जाणार आहे. कॅथ लॅब आणि रेडिओलॉजी युनिट पीपीपी तत्त्वावर सुरू करून अल्प दरात आरोग्य सेवा दिली जाईल.

६८ ठिकाणी हेल्थ वेलनेस सेंटर

आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने ६८ ठिकाणी हेल्थ वेलनेस सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. दहा ठिकाणी पॉलिक्लिनिक्स उभारली जातील.

नवीन नागरी आरोग्य केंद्रे 

सुनीलनगर, चोळेगाव, तिसगाव, विजयनगर, कचोरे, मोहने आणि  वायलेनगर येथे नवीन नागरी आरोग्य केंद्रे सुरू केली जातील. एक डायलिसिस सेंटर सुरू झाले आहे.  दोन ठिकाणी सुरू केले जातील.

सरकारकडून निधी आलाच नाही

आयुक्तांनी मागील वर्षी मालमत्ताकराच्या वसुलीवर जास्त भर दिला होता. त्यामुळे मनपाची विक्रमी वसुली झाली होती. कोरोनामुळे त्यांनी विकासकामांना कात्री लावली होती. मनपास मिळालेल्या उत्पन्नातूनच त्यांनी कोरोनाचा खर्च भागविला. सरकारकडे मागितलेला २१४ कोटींचा निधी मनपास प्राप्त झालेला नाही.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022kdmcकल्याण डोंबिवली महापालिका