शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात रेल्वे अभियंता अतुल यांच्या मृत्यूने सहकारी शोकाकूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:20 IST

मोने कुटुंबीयांसह पर्यटनासाठी जात. काही दिवसांपूर्वी ते पत्नी आणि मुलीसह काश्मीरला गेले होते. 

मुंबई - पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता अतुल मोने यांचा मृत्यू झाला. ते परळ वर्कशॉपच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत होते. मोने यांच्या जाण्याने त्यांचे सहकारी शोकाकूल आहेत.  

अतुल मोने रेल्वेत २००० साली कनिष्ठ अभियंता पदावर रूजू झाले होते. त्यांनी जवळपास २५ वर्षे रेल्वेत सेवा बजावली आहे. परळ वर्कशॉपमध्ये त्यांचा जवळपास ३० जणांचा ग्रुप होता. मोने अत्यंत मनमिळाऊ आणि कामात एकनिष्ठ असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. पर्यटनाची आवड असलेले अतुल यांचा दहशतवादी हल्ल्यात बळी जाईल, असे वाटले नव्हते, असे त्यांचे सहकारी म्हणाले. मोने कुटुंबीयांसह पर्यटनासाठी जात. काही दिवसांपूर्वी ते पत्नी आणि मुलीसह काश्मीरला गेले होते. 

अतुल आणि मी एकाच ठिकाणी काम करतो. तो माझ्या अगदी जवळचा होता. जेवण, चहा-पाणी रोज एकत्रच करत होतो. आता दुपारच्या चहासाठी कोणाला कॉल करू? - तमिला रसन, सहकर्मी  

अतुलबद्दल अशी दु:खद बातमी येईल, असे वाटले नव्हते. त्याला पर्यटनाची आवड होती. तो फिरायला तर गेला परंतु आता परत येणार नाही, याची कल्पना करवत नाही आहे. - राजेश नाडल, सहकर्मी

अतुल माने काश्मीरला जाताना  येतो असे सांगून गेले परंतु ते आता कधीच परत येणार नाहीत, या शब्दांत त्यांच्या शोकाकुल सहकाऱ्यांनी आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला