शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवा स्थानकात प्रवाशांना बंद वॉटर वेंडिंग मशीन सेवा बंद!

By अनिकेत घमंडी | Updated: September 21, 2022 16:35 IST

मध्य रेल्वे मार्गावर वॉटर वेंडिंग मशीनला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी दिवा स्थानकात मात्र मशीनला भरघोस प्रतिसाद मिळत होता.

डोंबिवली: रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त दरात पाणी पिण्यास मिळावं, यासाठी काही वर्षांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने बहुतांशी स्थानकात वॉटर वेंडिंग मशीन उभ्या केल्या होत्या. दिवा स्थानकातही तशी सेवा सुरु झाली होती, मात्र कोरोनापासून ती सेवा बंद पडली असून आताही सर्व नियम शिथिल झाले असतानाही ती सुरू झालेली नाही. मध्य रेल्वे मार्गावर वॉटर वेंडिंग मशीनला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी दिवा स्थानकात मात्र मशीनला भरघोस प्रतिसाद मिळत होता. त्या काळात दिवा शहरात पाण्याची भीषण टंचाई असताना या वॉटर वेंडिंग मशीन खऱ्या अर्थाने दिव्यातील रेल्वे प्रवाशांना तथा इथल्या सामान्य नागरिकांना उपयुक्त अशा ठरत होत्या. अगदी कमी भावात पाणी मिळत असल्याने बहुतांश प्रवासी घरातून तीन-चार बॉटल सोबत घेऊन कामावरून जात व येता वेळेस त्या स्थानकातून भरून घेत होते. परंतु सदरचा कंत्राट ज्या ठेकेदारांना देण्यात आला होता. त्यांनी वीज बिल व इतर बिलं थकवल्याने या सर्व मशीन मागील तीन ते चार वर्षापासून बंद अवस्थेत फलाटांवर मध्यभागी धुळखात उभ्या आहेत. 

दिवा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे. सकाळी गर्दीच्या वेळी या स्थानकात फलाटांवर उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नसते. यामुळे बऱ्याच वेळा प्रवाशांना अपघाताला देखील सामोरे जावे लागते. अशा गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या ह्या वॉटर वेंडिंग मशीन तात्काळ कार्यान्वित कराव्यात अन्यथा प्रवाशांना अडचण ठरत असलेल्या या वॉटर वेंडिंग मशीन फलाटांवरून काढून टाकाव्यात किंवा अन्यत्र हलवाव्यात अशी मागणी दिवेकर रेल्वे प्रवाशांतर्फे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. आदेश भगत म्हणाले.

या प्रकल्पाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, समस्या आली असून ती यंत्रणा बंद आहे, ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असून त्याची देखभाल जबाबदारी कोणती सामाजिक संस्था करते का? याबाबत देखील प्रयत्न सुरू आहेत असेही सांगण्यात आले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलWaterपाणी