शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीसाठी नागरिक "जागते रहोच्या" भूमिकेत; टोकन मिळवण्यासाठी रात्रीपासून रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 15:13 IST

कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लससाठा उपलब्ध होत  नसल्याने लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावी लागत आहे.

- मयुरी चव्हाण

कल्याणकल्याणडोंबिवली महानगर पालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लससाठा उपलब्ध होत  नसल्याने लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावी लागत आहे. त्यामुळे उद्याच्या भरवशावर अवलंबून न राहता आपल्याला आजच लस मिळावी या प्रयत्नात नागरिक आहेत. लसीचा साठा उपलब्ध झाल्याचा मेसेज केडीएमसीकडून मिळताच नागरिक टोकन घेण्यासाठी मध्य रात्रीपासूनच लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. केवळ आपल्याला लस मिळावी म्हणून तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही दिवस रात्र करून  लसीकरण केंद्राबाहेर बसत आहेत. त्यातच  नागरिक जास्त येत असल्याने टोकनही कमी पडू लागले आहेत. रात्री रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना  टोकन मिळत आहेत मात्र सकाळी  सहा ते सात वाजण्याच्या सुमारास  लसीकरण केंद्रांवर जाणाऱ्या नागरीकांना पुन्हा घरी जावे लागत असल्याचे चित्र आहे. तर बहुतांश ठिकाणी शाब्दिक चकमकीचे प्रकारही वाढले आहेत. 

बेड, ऑक्सिजन, औषध यासाठी करावी लागणारी धावपळ आता लसीकरणावर येऊन  ठेपली आहे. सुरवातीला लसीकरणावरून नाकं मुरडनारे नागरिक आता लसीसाठी जंग जंग  दिसत आहेत. नागरिकांना जास्त वेळ बसून  ठेवण्यापेक्षा टोकन देऊन त्या त्या वेळेनुसार  लसीकरण करण्याकडे काही  केंद्रांचा कल दिसतो. गेल्या  दोन आठवड्यात लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे.लस उपलब्ध होईल की नाही याचा सध्या काही भरवसा नसल्याने  नागरिक टोकनसाठी रात्रीपासून रांगा लावत आहेत.

डोंबिवलीतील  शिवमंदिर जवळील असलेल्या शाळेतील लसीकरण  केंद्रावर सोमवारी  टोकनमूळे काही काळ  गोंधळ उडाला होता. या ठिकाणी काही नागरिक रात्री एक वाजल्यापासून रांग लावून उभे होते. त्यामुळे सकाळी टोकन घ्यायला आलेल्या नागरिकांना पुन्हा घरचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते . काहींना रात्री तर काहींना सकाळी टोकन दिले गेल्याचा आरोप काही नागरीकांना केला. तसेच टोकन नेमकं देतात तरी कधी? असा सवालही   उपस्थित केला आहे.मात्र टोकन सकाळी 6 ते 7 या वेळेतच दिले जाते असे  सेना पदाधिकारी सागर जेधे यांनी सांगितले . 

टोकन वाटपाची एक वेळ ठेवणं निश्चित आहे. काहींना रात्री तर काहींना सकाळी टोकन वाटले गेले. सकाळी  सात वाजताच टोकन  संपल्याचा बोर्ड लावण्यात आला. त्यामुळे काहींना घरी जावे लागले. 

- सचिन गवळी , नागरिक 

आम्ही लसीकरण केंद्रावर नागरिकांना नेहमी मदत करतो. मात्र जेव्हा जेव्हा लस उपलब्ध होते तेव्हा सकाळी 6 ते 7 या  वेळेतच  टोकन वाटले जाते. अलीकडे लससाठा कमी असल्याने लस मिळते की नाही?या विवंचनेत नागरिक रात्रीपासूनच टोकन साठी रांगा लावत आहेत.

-सागर जेधे, शिवसेना पदाधिकारी.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका