शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

"नागरिकांना पाच दिवस पाणी मिळत नाही"; मंत्री रविंद्र चव्हाण संतापले...

By मुरलीधर भवार | Updated: September 26, 2022 21:33 IST

डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. 

डोंबिवली : पाच दिवस नागरीकांना पाणी मिळत नाही. केडीएमसीने टँकरही बंद केले. हे ऐकून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला. केडीएमसीचे नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. अधिकाऱ्यांवर प्रशासनाच्या प्रमुखाचा धाक राहिला नाही. लवकरात लवकर बैठक घेऊन पाणी टंचाईची समस्या दूर करणार असे आश्वासन त्यांनी नागरीकांना दिले आहे. डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मंत्री रविंद्र चव्हाण, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी धारेवर धरले होते. रखडलेल्या विविध विकास कामांसंदर्भात भाजप नेत्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभार पाहून भाजप नेते संतप्त झाले होते. अधिकाऱ्यांना नागरीकांची कामे करण्याची ताकीद दिली गेली. आज डोंबिवली पूर्व भागातील दावडी परिसरातील माजी नगरसेवक जालिंदर पाटील आणि स्थानिक नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. 

जालिंदर पाटील यांनी सांगितले गेल्या अनेक दिवसांपासून दावडी परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे. पाच पाच दिवस पाणी येत नाही. पाण्यासाठी महिलावर्गाला वणवण फिरावे लागते. आम्ही मंत्री चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. ही समस्या सोडविली पाहिजे. नागरीकांची ही समस्या ऐकून मंत्री चव्हाण हे संतप्त झाले. या संदर्भात वेळोवेळी सांगितले गेले आहे. महापालिकेचे नियोजन ढासळले आहे. प्रशासन प्रमुखाचा अधिकारी वर्गावर धाक नाही. मंत्री चव्हाण यांनी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांचाच उल्लेख केला. मात्र त्यांचा नामोल्लेख करणो टाळले. यासंदर्भात  लवकरात लवकर अमृत पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार आणि प्रशासन यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली