शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

KDMC Budget 2022: केडीएमटीतून लवकरच स्वस्तात गारेगार प्रवास, एसीच्या तिकिटात ४० टक्के कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 11:21 IST

KDMT Budget 2022: दीपक सावंत यांनी सादर केले बजेट : दर्जेदार वाहतूक सेवा देण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घटलेले उत्पन्न आणि इंधन दरवाढीमुळे अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या सुविधा अंमलबजावणीअभावी कागदोपत्रीच राहिल्या. मात्र, शुक्रवारी केडीएमसीचे व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०२२-२३ या वर्षात दर्जेदार वाहतूक सेवा देतानाच वातानुकूलित (एसी) बसच्या तिकीट दरात ४० टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना केडीएमटी बसमधून लवकरच स्वस्तात गारेगार प्रवास करता येणार आहे.

२०२२-२३ चे १६७ कोटी ३४ लाख रुपये जमा आणि १६४ कोटी ८४ लाख रुपये खर्च, असा अडीच कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पूर्वीच्या २५८ बसपैकी आयुर्मान संपलेल्या ५२ बस व नजीकच्या काळात आयुर्मान संपुष्टात येणाऱ्या आणि दुरुस्तीसाठी खर्चिक ६९ बस, अशा १२१ बस भंगारात काढण्यास मंजुरी मिळाली आहे. उर्वरित १३७ बस, ‘तेजस्विनी’च्या चार बस, अशा एकूण १४१ बस चालविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर २०७ इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या असून, चालू वर्षात त्यापैकी ११२ बस उपक्रमात दाखल होतील. यातील ५० बस एसी आहेत. याआधी उपक्रमाकडे १० एसी बस आहेत. दरम्यान, आता एसी बस वाढणार असल्याने त्या बसच्या भाडेदरात ४० टक्के कपातीचा उपक्रमाचा मानस  प्रवाशांसाठी दिलासादायक आहे. इलेक्ट्रिक बसमुळे उपक्रमाच्या खर्चातही ६० टक्के कपात होणार आहे.

६२ चार्जिंग स्टेशन उभारणार

इलेक्ट्रिक बस ताफ्यात येणार असल्याने तसेच नागरिकांचाही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे वाढलेला कल पाहता केडीएमसी स्वत:च्या मालकीची व पीपीपी तत्त्वावर ६२ चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.

व्हीटीएमएस प्रणाली

बस व बस थांबे तसेच तिकिटिंग प्रणालीत आधुनिकता आणण्यासाठी व्हीटीएमएस प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यात मोबाइल ॲपद्वारे बसचे वेळापत्रक व बसचा मार्ग पाहता येणार आहे.

आगारातील जागा देणार भाड्याने  

परिवहन उपक्रम तोट्यात आहे. त्यामुळे गणेश घाट, वसंत व्हॅली आगारातील परिवहनच्या मोकळ्या जागांवर वाणिज्य वापराच्या भव्य इमारती बांधून तेथे परिवहन उपक्रमासाठी आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधा देऊन उर्वरित जागा नामांकित कंपन्यांसाठी भाडे तत्त्वावर व विक्री करून उपक्रमाच्या उत्पन्नात चांगली भर पडेल, यादृष्टीने सल्लागार नेमून नियोजन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBudgetअर्थसंकल्प 2022