शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरच्या भागीदाराचा जामीन अर्ज फेटाळला; ६५ बेकायदा इमारतप्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:32 IST

या बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण- डोंबिवली पालिकेस दिले आहेत. येथे घरे घेणाऱ्यांची फसवणूक झाली आहे.

डोंबिवली : ६५ बेकायदा बांधकामप्रकरणी साई गॅलेक्सी या इमारतीचे बिल्डर शालिक भगत याचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात संबंधित बिल्डरांनी खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीवर एमपीडीए कारवाई होणार असल्याचे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी उद्धवसनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. 

या बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण- डोंबिवली पालिकेस दिले आहेत. येथे घरे घेणाऱ्यांची फसवणूक झाली आहे. या रहिवासीयांची घरे वाचविण्यासाठी उद्धवसेनेने पुढाकार घेतला. याप्रकरणी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर  यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. 

खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यांची चौकशीप्रांताधिकारी गुजर यांनी या प्रकरणात खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले होते. तहसीलदार शेजाळ यांनी खोटी कागदपत्रे तयार करणारे साई डेव्हलर्पचे भागीदार शालिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश रामनगर पोलिसांना दिले होते. पोलिसांनी भगत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भगत याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. 

एमपीडीएअंतर्गत कारवाईदरम्यान, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी मंगळवारी सायंकाळी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी पराग मणेरे यांची भेट घेतली. खोटी कागदपत्रे प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. मणेरे यांनी म्हात्रे यांना आश्वासन दिले आहे की, ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात संबंधित बिल्डरांनी खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीवर एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाईल.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय