शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या चार रेल्वे प्रवाशांसाठी काळा बुधवार; दोन पुरुष, दोन महिलांचा अपघातात मृत्यू 

By अनिकेत घमंडी | Updated: January 3, 2024 19:36 IST

कोपर, ठाकुर्लीत वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू

अनिकेत घमंडी, डोंबिवली: नववर्षाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी डोंबिवलीच्या चार रेल्वे प्रवाशांसाठी काळा दिवस ठरला. दोन प्रवाशांचा लोकलमधून पडून आणि अन्य दोन जणांचा रूळ।ओलांडताना अज्ञात लोकलची धडक लागून मृत्यू झाल्याची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली. हे सगळे अपघात कोपर, ठाकुर्ली कल्याण रेल्वे मार्गावर अप, डाऊन जलद धीम्या मार्गांवर झाले.

मयतांमध्ये दोन पुरुष, दोन।महिलांचा समावेश आहे. त्यापैकी एक महिला, पुरुष लोकलमधून पडून तर अन्य दोघे रूळ ओलांडण्याच्या नादात अपघात झाले. या चार अपघातात केवळ लोकलमधून पडलेल्या एका पुरुष प्रवशाची ओळख पटली असून तिघांच्या वारशांचा तपास पोलीस घेत आहेत. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात तीन घटना सकाळी घडल्या, त्यानंतर चौथी घटना संध्याकाळी घडल्याची माहिती त्यांना मिळाली असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पाठवल्याचे सांगण्यात आले. सुशील पूतरन (५०) रा. गणेश अपार्टमेंट, तिसरा मजला, अंबिका हॉटेल जवळ, डोंबिवली पूर्व असे डोंबिवली कोपर मार्गावर लोकलमधून।पडून मयत झालेल्या प्रवाशाचे नाव असून नेहमीप्रमाणे कामावर जण्यासाठी ते घरातून निघाला त्यानंतर स.८: ४० वाजता अपघात झाल्याची माहिती मिळल्याचे सांगण्यात आले.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जखमी अवस्थेत शास्त्रीनगर इस्पितळात नेण्यात आले, मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. मयताचे वारस।मिळाले असून त्यांना अपघाताबाबत माहिती देण्यात आली. अन्य दोन अपघातात एक महिला मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास अज्ञात लोकलची धडक लागून तर दुसरी महिला सकाळी ८:१५ वाजता लोकल मधून पडून मयत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त।केला,तिसऱ्या इसमाचा अपघात कसा झाला याचा शोध घेणे सुरू होते.

टॅग्स :Accidentअपघात