शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेनेत पोस्टर'वॉर', 'आम्ही करून दाखवलं तर तुम्ही गाजर दाखवलं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 12:59 IST

शिवसेनेने बॅनरमध्ये आम्ही करून दाखवले तुम्ही गाजर दाखवलं, तीन वेळा आमदार, तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी, डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा, तीन कामे तरी दाखवा असं आवाहन करण्यात आलंय

डोंबिवली - राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघत असताना कल्याण डोंबिवली शहरात सुद्धा सेना भाजप मधील वाद विकोपाला गेला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच  डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी आहेत असा आरोप करत शिंदे यांच्याविरोधात डोंबिवली शहरात बॅनरबाजी केली होती.त्यानंतर आज सेनेनं सुद्धा बॅनरबाजी करत भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांना टार्गेट केलंय. त्यामुळे शहरात निवडणुकीच्या तोंडावर बॅनरवॉर चांगलंचं तापलेलं दिसतंय.     शिवसेनेने बॅनरमध्ये आम्ही करून दाखवले तुम्ही गाजर दाखवलं, तीन वेळा आमदार, तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी, डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा, तीन कामे तरी दाखवा असं आवाहन करण्यात आलयं. इतकंच नाही तर गाजराचा फोटो देखील लावण्यात आलाय. मात्र, अवघ्या काही तासाभरातच हे बॅनर केडीएमसीनं पोलिसांच्या मदतीनं काढले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं होतं. पालक मंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी केला होता. यानंतर डोंबिवलीत या आशयाचे बॅनर देखील भाजपकडून लावण्यात आले होते. याला आता सेनेनं बॅनर लावून प्रत्युत्तर दिलं आहे.        या बॅनरवर एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे त्यावर फक्त 2 वर्षाच्या काळात 1690 कोटीचे प्रकल्प मार्गी लावून दाखवले असं लिहत कामांची यादी टाकण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला तीन वेळा आमदार तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी, डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा, तीन कामे तरी दाखवा असं आवाहन करत गाजराचा फोटो आहे. भजपाचे बॅनर लागलीच हटवण्यात आले होते. त्यामुळे सेनेच्या बॅनरबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र, हे बॅनर सुद्धा लागलीच हटवण्यात आले. राजकीय पक्षांच्या या बॅनरबाजीमुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढलीये.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीShiv Senaशिवसेनाthaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका