शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्के कोट्यातील १३३५ घरे बिल्डरांच्या ताब्यात, भाजप आमदार गणपत गायकवाड यांची धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:26 IST

Kalyan News : दहा टक्के कोटय़ातील १३३५ आरक्षीत घरे बिल्डरांनी कल्याण डोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत केलेली नाही. ही घरे बिल्डरांनी विकली आहेत. तर काही ठिकाणी भाडय़ाने दिलेली आहेत.

कल्याण - दहा टक्के कोटय़ातील १३३५ आरक्षीत घरे बिल्डरांनी कल्याण डोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत केलेली नाही. ही घरे बिल्डरांनी विकली आहेत. तर काही ठिकाणी भाडय़ाने दिलेली आहेत. ही घरे महापालिकेने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.यासंदर्भात आमदार गायकवाड यांनी महापालिका आयक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. आयुक्तांच्या भेटीपश्चात त्यांनी ही माहिती दिली. महापालिका हद्दीत 1क् टक्के कोटय़ातील घरे बिल्डरांच्या ताब्यात आहे. ही घरे महापालिकेने ताब्यात घेतलेली नाही. ही घरे बिल्डरांनी विकली आहेत. काही ठिकाणी भाडय़ो दिलेली आहेत. याविषयी आयुक्तांनी हात वरती केले आहे. हा विषय ठाणो जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे. त्यांच्याकडून ही कारवाई केली पाहिजे असे सांगितले आहे. आमदार गायकवाड यांनी १३३५ घरे महापालिकेने ताब्यात घेतली नसल्याची बाब माहिती अधिकारात माहिती मागवून घेतली होती. आमदारांचा हा गौप्यस्फोट पाहता महापालिका 10 टक्के कोटय़ातील घरे ताब्यात घेण्याबाबत किती उदासीन आहे की बाब समोर आली आहे.नुकताच कल्याण स्टेशन पश्चीम परिसरातील स्मार्ट सिटी सुधारणा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पूव्रेतील विकास कामांना प्राधान्य दिलेले नाही. काही ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत. महापालिका शून्य कचरा मोहिम राबवित असली तरी अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उलला जात नाही. घंडागाडीवर कामगारांनी कोरोना काळात काम केले आहे. त्यांना पगार दिला जात नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रस्त्यावरील चेंबर्स झाकणो फुटली आहे.त्याच्या दुरुस्ती कामाचे बिल कंत्रटदार लाटत आहे. या कामाकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे अशी मागणी आमदार गायकवाड यांनी आयुक्तांशी केलेल्या चर्चे दरम्यान केली. कल्याण पूव्रेतील चिंचपाडा, माणेरे, आशेळे, नांदीवली, वसार, डावलपाडा, द्वारली या भागात  पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. या भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. पुना लिंक रोडच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट सोडले आहे. मलंग रोडवरील पथ दिवे बंद अवस्थेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कोणत्या कारणामुळे थांबले आहे याची माहिती आमदार गायकवड यांनी आयुक्तांकडे मागितली.या विविध प्रकरणात आयुक्तांनी भेट देऊन पाहणी करावी. हे विषय मार्गी लावण्यात यावे अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे. आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाईल असे आश्वासन आमदारांना चर्चेअंती  दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण