शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड

By मुरलीधर भवार | Updated: February 20, 2024 01:13 IST

पोलिसांनी सहा आरोपीं विरोधात केला गुन्हा दाखल

कल्याण - गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचा ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. कोळशेवाडी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे पाच सहकारी गोळीबार प्रकरणात तळोजा जेलमध्ये आहेत. या प्रकरणात जखमी गोळीबार शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचे  कार्यालय आहे. हे कार्यालय त्यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड हे चालवतात. सोमवारी संध्याकाळी केबल कार्यालयाच्या समोर एक बाईक उभी करण्यात आली होती. त्या बाईक सोबत एक तरुण काहीतरी करत होता.

कार्यालयातील एका व्यक्तीने हे पाहिले .त्यांनी त्या तरुणाला हटकले ,त्यानंतर कार्यालयातील व्यक्ती आणि त्या तरुणांसोबत वाद सुरू झाला. या तरुणांनी आपल्या पाच ते सहा सहकाऱ्यांना फोन करून बोलून घेतले.  सहा तरुण आमदारांच्या केबल कार्यालयाच्या समोर आले. सर्वांनी मिळून गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी सहा आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तोडफोड करणारे तरुण कोण आहेत ? या प्रकरणाच्या  तपास आता कोळशेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या साह्याने पोलिसांच्या तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड यांचा हा कार्यालय त्यांच्या निवासस्थान आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून जवळच आहे.