शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

BJP : कोकण शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी भाजपाचीच, अनिल बोरनारे यांनी दिली माहिती

By अनिकेत घमंडी | Updated: October 7, 2022 14:35 IST

Konkan teacher constituency: फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत सर्वाधिक नोंदणी भाजपाचीच होत असल्याचे  प्रतिपादन भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले.

- अनिकेत घमंडीडोंबिवली  - मागील एक अपवाद वगळता कोकण विभाग शिक्षक मतदार संघ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ राहिला असून फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत सर्वाधिक नोंदणी भाजपाचीच होत असल्याचे  प्रतिपादन भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडळाने भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोरनारे बोलत होते. यावेळी डोंबिवली पश्चिम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप चौधरी, सरचिटणीस समीर चिटणीस, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, कोकण विभाग संयोजक एन एम भामरे, शिक्षक परिषदेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष हेमलता मुनोत, मंडळ उपाध्यक्ष सुरेश जोशी, सुजित महाजन गीता नवरे, सचिव मनीष शिंदे, देवेश शुक्ला शिरोळकर हायस्कुलच्या डायरेक्टर श्वेता धोपटे, महिला आघाडी सरचिटणीस रुचिता चव्हाण, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दिनेश जाधव, डोंबिवली बशिक्षक आघाडी संयोजक सुनिल पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस कृष्णा पसरुळेकर यासह मीना कोलवाडकर, साधना गायकवाड, मुंडेकर सर, कैलास माळी, वैभव गवस, खैरनार सर, समीर सुर्वे, उगमसिंग शेखावत, पांडुरंग म्हसकर, विलास भोपतारव, पल्लवी जोशी व भावसार मॅडम यासह मंडळातील सर्व पदाधिकारी व शहरातील विविध शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.  बैठकीचे प्रास्ताविक डोंबिवली पश्चिम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी केले. 

या बैठकीला मार्गदर्शन करतांना  अनिल बोरनारे यांनी शिक्षक मतदारसंघाची नोंदणी करतांना पात्र शिक्षकांकडून फॉर्म भरतांना कोणती काळजी घ्यावी फॉर्मसोबत कोणते पुरावे जोडावे यासह डोंबिवलीमधील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये वितरित केलेले नोंदणी फॉर्म जमा करण्याचे आवाहन शिक्षकांना केले.

कोकण शिक्षक मतदारसंघात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असून ठाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने शाळा असल्याने सर्वाधिक नोंदणी ठाणे जिल्ह्यातुन होत असते तसेच मुंबईतील शाळांमध्ये शिकविणारे शिक्षक शेकडोच्या संख्येने ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यात राहत असल्याने त्यांचीही नोंदणी करून घेत असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप चौधरी यांनी केले.

भाजपाकडून अनिल बोरनारे इच्छुकमागील २४ वर्षांपासून शिक्षक परिषद व  भाजपा शिक्षक आघाडी  मध्ये सक्रिय असलेले अनिल बोरनारे यांनी भाजपाकडून उमेदवारी मागितली आहे. कोकण शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक नोंदणीसाठी त्यांनी दोन वर्षांपासून काम सुरू केले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठविणारे अनिल बोरनारे यांचा शिक्षकांशी थेट संपर्क असल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे भाजपा अनिल बोरनारे यांना उमेदवारी देते की अन्य कुणाला ? यावर आता शिक्षणक्षेत्रात चर्चा रंगत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाdombivaliडोंबिवलीVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक