शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला कमीशन खाण्याची सवय; शिवसेना नेत्याचं रविंद्र चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 18:45 IST

शिवसेना भाजपमधील आरोप प्रत्यारोपावरुन कल्याण डोंबिवलीतील राजकारण तापले आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवलीतील समस्या संदर्भात काल भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान त्यांनी मिशन डोंबिवली नसून कमीशन डोंबिवली असल्याची टिका शिवसेनेसह त्यांच्या नेतमंडळीच्या विरोधात केली होती. या टिकेपश्चात शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना ही विकास कामे करते. ती कमीशन खात नसून कमीशन खाण्याची सवय भाजपला असल्याची टिका केली केली आहे.

कालच्या आक्रोश मोर्चात भाजप आमदार चव्हाण यांनी सत्ताधारी शिवसेनेवर सडेतोड टिका केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करताना चव्हाण यांची जीभ घसरली. मोठा गाव पूलासाठी ५ कोटीचा निधी हवा आहे. स्थानिक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांचा हात पकडा नाही तर काही पण काहीपण पकडा तो ५ कोटीचा निधी आणा अशी भाषा वापरली होती. एका आमदाराला ही भाषा शोभत नाही याकडे नगरसेवक म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोटय़ावधी रुपयांची विकास कामे मंजूर करुन आणली आहेत. तसेच ही कामे प्रत्यक्षात आली आहे. काही कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र भाजप आमदार चव्हाण यांनी निवडणूकीच्या तोंडावर ४७२ कोटी मंजूर करुन आणल्याचे सांगत कामाचे नारळ फोडले होते. हा निधी कोणत्या खात्यामार्फत मंजूर करुन आणला होता. निधी मंजूर झाला होता तर त्या निधीतून कामे का झाली नाही. कारण चव्हाण यांच्याकडे ४७२ कोटी निधी मंजूर करुन आणल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्यांच्याकडे पुरावा असल्यास तो त्यांनी सादर करावा असे आव्हान नगरसेवक म्हात्रे यांनी भाजपला केले आहे. चव्हाण यांनी विकास कामे केली नाहीत. ते विकास कामातील शुक्राचार्य आहे अशी टिका म्हात्रे यांनी चव्हाण यांच्यावर केली आहे. शिवसेना भाजपमधील आरोप प्रत्यारोपावरुन कल्याण डोंबिवलीतील राजकारण तापले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा