शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे आज भूमीपूजन

By मुरलीधर भवार | Updated: June 16, 2023 20:43 IST

या पूलाच्या कामाकरीता ४२ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

कल्याणकल्याण रेल्वे स्टेशन आणि पूर्व भागाला जोडणाऱ््या लोकग्राम पादचारी पूलाचे भूमीपूजन उद्या कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे.

या पूलाच्या कामाकरीता ४२ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या भूमीपूजना पश्चात कल्याण डोंबिवलीसह आणि भिवंडीतील शिवसेना शिंदे गटाचा मेळावा अत्रे रंगमंदिरात पार पडणार आहे. या मेळाव्यास खासदार शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या आरोखाली गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांच्या विराेधात भाजपने मोर्चा काढला.

या मोर्चात शिवसेना शिंदे गट सहभागी झाला नाही. शिंदे गटाकडून योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप करीत भाजपने त्यांच्या पक्षाच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव केला. त्यानंतर राजकारण तापले. खासदार शिंदे यांनी राजीनामा देण्यास मी तयार आहे. उमेदवार कोण हे सांगा असे आवाहन दिले. हा वाद खूप गाजत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा वाद स्थानिक पातळीवरील आहे असे स्पष्ट केले.

मात्र काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार शिंदे यांच्या बैठक झाली. वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर उद्या कल्याणमध्ये खासदार शिंदे हे मेळावा घेणार असल्याने ते कार्यकर्त्यांना काय संबोधन करणार याकडे सगळयाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे