शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये घंटानाद, बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीची पूजाअर्चा करायला बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 07:43 IST

Navi Mumbai News: ऐतिहासिक किल्ले दुर्गाडी येथील दुर्गाडी मंदिरात बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम धर्मीयांना नमाजपठण करून दिले जाते. मात्र, हिंदूंना देवीची पूजाअर्चा करण्याचा हक्क नाकारला जातो. मंदिर प्रवेशही नाकारला जात असल्याच्या निषेधार्थ शनिवारी शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या वतीने घंटानाद आंदाेलन करण्यात आले. 

कल्याण - ऐतिहासिक किल्ले दुर्गाडी येथील दुर्गाडी मंदिरात बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम धर्मीयांना नमाजपठण करून दिले जाते. मात्र, हिंदूंना देवीची पूजाअर्चा करण्याचा हक्क नाकारला जातो. मंदिर प्रवेशही नाकारला जात असल्याच्या निषेधार्थ शनिवारी शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या वतीने घंटानाद आंदाेलन करण्यात आले. 

दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीच्या मंदिराला लागून मुस्लीम बांधवांची नमाजपठणाची जागा आहे.  ईदला मुस्लीम धर्मीय नमाजपठण करतात. नमाजपठणाच्या काळात दुर्गाडीदेवी मंदिरातील घंटा आणि नगारा लाल कपड्याने बांधून ठेवला जातो. मंदिर बंद करून पूजाअर्चा करण्यास मज्जाव केला जातो. याविरोधात शिवसनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी घंटानाद आंदोलन सुरू केले होते. पोलिस प्रशासनाने शिंंदेसेना आणि उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची अलीकडेच एक बैठक घेतली होती. या बैठकीतून काही साध्य झाले नाही. 

वेगवेगळा न्याय पोलिसांनी घंटानाद करण्यास प्रथम शिंदेसेनेला वेळ दिली. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजेश मोेरे, प्रकाश पाटील, अरविंद मोरे, महेश गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी घंटानाद केले. 

उद्धवसेनेचे नेते विजय साळवी यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन केले. जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, साईनाथ तारे आदी सहभागी झाले होते. साळवी म्हणाले की, एका समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या समाजावर अन्याय केला जात आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण