शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्वानाला आंघोळ घालणे बहीण-भावाच्या बेतले जीवावर, तलावात बुडून दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 09:56 IST

श्वानाला आंघोळ घालण्यासाठी रविवारी नेहमीप्रमाणे तलाव परिसरात दोघे गेले होते.

डोंबिवली : पाळीव श्वानाला आंघोळ घालण्यासाठी तलावात गेलेल्या भावा बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दावडी परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. रणजित रवींद्रन (२२) व कीर्ती रवींद्रन (१७) अशी दुर्दैवी भावा-बहिणींची नावे आहेत.

पश्चिमेतील उमेशनगर परिसरात रणजित व कीर्ती हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या आजोबांचे महिनाभरापूर्वी निधन झाल्याने त्यांचे आई- वडील गावी गेले असून हे दोघेच येथे राहत होते. त्यांच्याकडे असलेल्या श्वानाला आंघोळ घालण्यासाठी रविवारी नेहमीप्रमाणे तलाव परिसरात दोघे गेले होते. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास श्वानाला आंघोळ घालताना दाेघांचा ताेल जाऊन ते पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागल्याने जीव वाचविण्यासाठी धडपडत होते. 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तलाव परिसरात त्यांचा शोध घेतला असता रणजित व कीर्ती यांचे मृतदेह जवानांच्या हाती लागले. दोघांचे मृतदेह मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.

दोघांना वाचविण्यासाठी श्वानाची धडपडतलावात पडल्यानंतर बुडू लागल्याने रणजित व कीर्ती हे दोघेही जीव वाचविण्यासाठी धडपडत होते. त्यांची धडपड पाहून तलावाच्या काठावर उभा राहून श्वान जोरजोरात भुंकत होता. दुपारची वेळ असल्याने यावेळी फारशी वर्दळ नव्हती. याचदरम्यान श्वान का भुंकत आहे हे पाहण्यासाठी आलेल्या एका ग्रामस्थाने तलावात कोणी तरी बुडत असल्याचे पाहिले. त्यानंतर, ही माहिती अग्निशमन व पोलिसांना देण्यात आली.

धावत सुटला गाडीच्या मागे...रणजित व कीर्ती यांचा शोध सुरू असताना काठावर उभा असलेला त्यांचा पाळीव श्वान सतत भुंकत त्यांना शोधत होता. कीर्ती व रणजित यांचे मृतदेह हाती लागल्यावर ते रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले. रुग्णवाहिका सुरू होताच श्वानही त्या गाडीच्या पाठीमागे धावू लागला. तेव्हा, त्याला तेथे उपस्थित असलेल्यांनी धरुन ठेवले. त्यांच्या दुचाकीच्या मागेही श्वान धावत होता.

टॅग्स :dombivaliडोंबिवली