शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

वादाचा बदला घेण्यासाठी बार मॅनेजर आणि वेटरवर शस्त्राने हल्ला, तिघांना अटक 

By प्रशांत माने | Updated: June 15, 2023 18:43 IST

नाबीर हा कल्याण पूर्वेतील नांदीवलीतील कशिश बार अॅण्ड रेस्टॅारन्टमध्ये कामाला होता.

डोंबिवली : बार मॅनेजर आणि अन्य एका वेटर बरोबर झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांच्यावर शस्त्राने हल्ला करून त्यांना लुटणाऱ्या वेटरला आणि त्याच्या दोन साथीदारांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. नाबीर इन्सफअली शेख रा. उल्हासनगर असे अटक केलेल्या वेटरचे नाव असून त्याला साथ देणाऱ्या प्रेमकुमार गोस्वामी आणि सुरज विश्वकर्मा रा. आंबिवली यांनाही अटक केली आहे.

नाबीर हा कल्याण पूर्वेतील नांदीवलीतील कशिश बार अॅण्ड रेस्टॅारन्टमध्ये कामाला होता. तेथील मॅनेजर भिम सिंग आणि वेटर अकलेश चौधरी यांच्याबरोबर त्याचा वाद झाला होता. वादानंतर त्याने नोकरी सोडली होती. परंतू वादाचा राग त्याच्या मनात होता. यातून २७ मे च्या मध्यरात्री दोनच्या सुमारास मॅनेजर सिंग हे बार बंद करून दुचाकीने घरी जात असताना नाबीरने साथीदारासह मलंगरोडवर सिंग यांच्यावर हल्ला केला यात सिंग जखमी झाले. त्यांची दुचाकी आणि डिक्कीत असलेली रोकड घेऊन नाबीर साथीदारासह तेथून पसार झाला. तर १० जूनच्या मध्यरात्री त्याने वेटर अकलेश याच्यावर देशमुख होम्स कमानी जवळ चाकूने हल्ला केला. अकलेशचे आयफोन व पैशांचे पाकीट घेवून नाबीरने पोबारा केला होता.

चोरीचाही अवलंबिला मार्गया गुन्हयांचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग करीत होती. वरीष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर , संजय माळी, पोलिस हवालदार विश्वास माने, अनुप कामत, बापुराव जाधव, बालाजी शिंदे, प्रविण बागुल, रमाकांत पाटील, श्रीधर हुंडेकरी, किशोर पाटील, विलास कडु, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, बोरकर आदिंचे पथक तपास करत होते. गुन्हा घडलेल्या ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे तिघांच्या मुसक्या आवळण्यात पथकाला यश आले. हॉटेल मॅनेजर आणी वेटरवरील हल्ल्याच्या घटनेनंतर संबंधितांनी चोरीचा मार्गही अवलंबिला होता. मानपाडा आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन तर खडकपाडा पोलिस ठाण्यात एक गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल असून तीन दुचाकी आणि पाच मोबाईल असा १ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारी