शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! महिलेची प्रसूती कल्याणच्या स्कायवॉकवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 07:26 IST

१०८ नंबरने दिला दगा, रिक्षा चालक धावले मदतीला

लाेकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण पूर्व भागातील रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉकवरुन गरोदर महिला तिच्या नातेवाईकासह रुग्णालयात जात असताना तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. तिच्या प्रसूतीसाठी रिक्षा चालक धावले. यावेळी रिक्षा चालकांनी १०८ नंबरवर कॉल  करुन रुग्णवाहिका मागवली असता त्यांच्याकडून रुग्णवाहिका निघाली असल्याचे सांगितले. मात्र, रुग्णवाहिका आलीच नाही. तिची प्रसूती स्कायवॉकवरच झाली. अखेरीच खासगी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ती व तिचे नवजात बाळ सुखरुप असल्याची माहिती मदतीसाठी आलेल्या रिक्षा चालकांनी सांगितले. 

कल्याण पूर्व भागात राहणारी गरोदर महिला सुरेखा शिंदे हिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने ती तिच्या नातेवाईकासोबत महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात निघाली होती. कल्याण पूर्वेतील रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर पोहचली असता तिला प्रसूतीच्या वेदना असहय्य हाेऊ लागल्या. वेदनांची तीव्रता वाढली. तिच्या मदतीला रिक्षा चालक धावले. त्यांनी रुग्णवाहिकेसाठी १०८ नंबरला  केला. त्यावेळी तिथून असे सांगण्यात आले की, रुग्णवाहिका निघाली आहे. मात्र त्याठिकाणी रुग्णवाहिकाच पोहचली नाही. अखेर महिलेची अवघड अवस्था पाहून रिक्षा चालकांनी प्रसंगावधान  राखत एका महिलेला पाचारण केले. 

ते धावले तिच्या मदतीलारिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन गणेशोत्सव मंडपात उपस्थित असलेले उपाध्यक्ष विजय तावडे, कार्यकर्ते संजय जगताप यांनी प्रसंगावधान दाखवले. रुग्णवाहीकेने रुग्णालयात दाखल करण्यास बाबा शेख, चंदनशिवे, मनोज यादव, श्री जोशी, गणेश सुर्यवंशी, ‘प्रेम बंगाली या रिक्षा चालकांनी मदत केली.

n काही दिवसांपूर्वी गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना स्कायवॉकवर सुरु झाल्यावर तिला हातगाडीवरुन महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले असता. त्याठिकाणी तिला प्रसूतीकरीता दाखल करुन न घेतल्याने तिची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली होती. त्यामुळे महापालिका रुग्णालयाची अनास्था उघड झाली होती. आता पुन्हा एका महिलेची प्रसूती स्कायवॉककवर झाली. तिच्यासाठी १०८ नंबरवर रुग्णवाहिकेसाठी कॉल करुन रुग्णवाहिका आली नाही. ही बाब या घटनेतून उघड झाली आहे.

टॅग्स :Womenमहिलाpregnant womanगर्भवती महिलाkalyanकल्याण