शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना; मित्रानेच केला मित्रावर पैशाच्या वादातून गोळीबार

By पंकज पाटील | Updated: September 5, 2024 21:06 IST

पैशाच्या वादातूनच मित्राने मित्रावर गोळी चालवण्याचे पोलीस प्रशासनामार्फत सांगण्यात आले.

पंकज पाटील, बदलापूर :बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या गोळीबारात एका तरुणाच्या पायाला गोळी लागल्याचेही समोर आले आहे. पैशाच्या वादातूनच मित्राने मित्रावर गोळी चालवण्याचे पोलीस प्रशासनामार्फत सांगण्यात आले.  

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर मुख्य बाजारपेठेत सायंकाळच्या सुमारास चार मित्रांमध्ये पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाले. या वादानंतर हे चौघे रेल्वे स्थानक परिसरात आले असता पुन्हा त्यांच्याच वादावादी सुरू झाली. यापैकी शंकर संसारे नामक तरुणाने त्याचाच मित्र असलेल्या विकास पगारे याच्यावर गोळीबार केला. तब्बल तीन राऊंड रेल्वे स्थानकात फायर करण्यात आले त्यापैकी एक गोळी पगारे याच्या पायाला लागली. गोळीबार करून आरोपी संसारे हा रेल्वे रुळावरून पळत जात असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. तर दुसरीकडे जखमी असलेला पगारे हा परस्पर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे. 

- सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मवर ही गोळीबाराची घटना घडली त्यानंतर आरोपी पळून जाण्यासाठी रेल्वे रुळावर उडी मारत असताना त्याचा पाय घसरला आणि त्यात तो खाली कोसळला. त्यात त्याच्या हाताला दुखापत झाली अशा परिस्थितीतही तो रेल्वे रुळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

- या गोळीबारात जो पगारे नामक तरुण जखमी झाला आहे त्याच्या हातात देखील बंदूक दिसत असल्यामुळे नेमकी ही बंदूक त्याच्याकडे आली कुठून असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

- पगारे हा जखमी झाल्यानंतर देखील आरोपी संसारे याला गाठण्याचा प्रयत्न करीत होता मात्र दुसऱ्या मित्राने त्याला तिथून बाहेर काढल्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

- ज्यावेळेस गोळीबाराची घटना घडली त्यावेळेस आजूबाजूला मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ सुरू होती. मात्र फायरिंगचा आवाज येताच प्रवाशांनी तिथून काहीसा पळ काढला. 

- फायरिंग करून पळणारा आरोपी याला पोलिसांनी पाठलाग करून रेल्वे रुळातच गाठल्यानंतर काही रेल्वे प्रवाशांनी देखील या आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळे पोलिसांना देखील प्रवाशांची मदत झाली. 

टॅग्स :badlapurबदलापूर