शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून रिक्षा संघटनेच्या पदाधिका-यावर हल्ल्याचा प्रयत्न

By प्रशांत माने | Updated: February 1, 2024 18:04 IST

चाकू दगडाचा वापर; रिक्षाचालक पसार.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: येथील पश्चिमेकडील उमेशनगर परिसरात बुधवारी रात्री एका रिक्षाचालकाने रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी असलेल्या शेखर जोशी यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालक पसार झाला असून याप्रकरणी जोशी यांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रिक्षाच्या मिळालेल्या क्रमांकावरून पोलिस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

जोशी उमेशनगरमधील तोंडवळकर विदयालयासमोरील चहाच्या टपरीवर चहा पित होते. त्यांची दुचाकी टपरीच्या समोर उभी होती. चहा पिऊन झाल्यावर त्यांच्या दुचाकीसमोर उभी असलेली रिक्षा दुचाकी काढेपर्यंत थोडी बाजुला घे असे जोशी यांनी संबंधित रिक्षाचालकाला सांगितले. याचा राग रिक्षाचालकाला आला. रस्ता तुमच्या बापाचा आहे का. रिक्षा जागेवरून काढणार नाही अशी अरेरावीची भाषा बोलत रिक्षाचालकाने जोशी यांच्याशी वाद घातला. तो एवढयावरच नाही थांबला त्याने रिक्षात ठेवलेला चाकू आणला आणि दुस-या हातात दगड घेऊन तो जोशी यांच्या डोक्यात टाकण्याच्या प्रयत्नात होता. परंतू टपरी जवळील काही नागरिक मध्ये पडल्याने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी