शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित मालमत्ताकर बिलांचे आश्वासन अद्याप कागदावरच! केडीएमसीला मुहूर्त मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 01:18 IST

KDMC News : एमआयडीसी निवासी भागातील वाढीव मालमत्ता कर कमी करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये झाला. पण, केडीएमसीकडून अद्याप सुधारित बिले रहिवाशांना देण्यात आलेली नाहीत.

डोंबिवली -  एमआयडीसी निवासी भागातील वाढीव मालमत्ता कर कमी करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये झाला. पण, केडीएमसीकडून अद्याप सुधारित बिले रहिवाशांना देण्यात आलेली नाहीत. जानेवारीत बिले वितरित केली जातील, असे कर निर्धारक व संकलक विभागाने स्पष्ट केले होते. जानेवारी संपूनही बिले अदा न झाल्याने महापालिकेचे ते आश्वासन कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.बिलांमध्ये घराचे वार्षिक करयोग्य मूल्य अवाजवी व चुकीच्या पद्धतीने नोंदवल्याचा आक्षेप रहिवाशांचा होता. बांधकाम झालेल्या वर्षातील रेडीरेकनरनुसार वार्षिक करयोग्य मूल्य नोंदवावे तर निवासी विभागाला पाणीपुरवठा हा थेट एमआयडीसीतून होतो तसेच ड्रेनेजसंबंधी देखभालही एमआयडीसी करते, त्यामुळे पाणीपट्टी आणि इतर लाभकरातून सुटका व्हावी, अशी विनंती करण्यात आली होती. यासंदर्भात डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने सातत्याने केलेला पाठपुरावा आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विशेष बैठक होऊन वाढीव बिले कमी करून सुधारित बिले रहिवाशांना पाठवण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेण्यात आला. मालमत्ता कर आकारणी बिले कमी करण्यासाठी रहिवाशांकडून महापालिकेने अर्ज मागविले होते. मालमत्ता कराचे बिल तसेच २००२ किंवा त्यापूर्वीची बिले अर्जासोबत जोडण्यास सांगितले होते. यावर बिलांमध्ये दुरुस्ती करून सुधारित बिले रहिवाशांना देण्यात येणार होती. निवासी भागातील बहुतांश सोसायट्यांनी आणि बंगलेधारकांनी अर्ज महापालिकेला सादर केले आहेत. दुरुस्तीची बिले रहिवाशांना मिळालेली नाहीत. आता आयुक्तांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे आणि सचिव राजू नलावडे यांनी केली. बिलांची रक्कम सात कोटींच्या घराततीन वर्षांपासून चुकीची व जाचक बिले येत असल्याने ती भरण्यास रहिवाशांचा विरोध होता. सुधारित बिले भरण्यास नागरिक तयार असताना ती मिळालेली नाहीत. एमआयडीसी निवासी भागातील सोसायट्या, बिल्डिंगच्या सुधारित कर बिलांची तसेच बंगले, व्यापारी आस्थापने यांची एकूण तीन वर्षांची मिळून अंदाजे रक्कम सात कोटींच्या आसपास आहे. एमआयडीसी निवासीव्यतिरिक्त इतर गावांतील व औद्योगिक विभागातील सुधारित बिले यांची रक्कम वेगळी असल्याने हा आकडा अजून वाढू शकतो. जेवढा बिले वितरित करायला उशीर केला जातोय तेवढे यावर मिळणाऱ्या व्याजालाही केडीएमसी मुकणार आहे, याकडेही नलावडे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका