शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणनजीक इराणी वस्तीत पुन्हा पोलिसांवर प्राणघातक हल्ला; दहा पोलिस जखमी

By मुरलीधर भवार | Updated: November 9, 2023 20:39 IST

खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुरलीधर भवार, कल्याण-कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील इराणी वस्तीत पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना मध्यरात्रीस घडली आहे. एका इराणी चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक इराणी वस्तीत गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेत दहा पोलिस जखमी झाले आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्हयात तीन आराेपी पोलिसांना हवे होते. ते आंबिवली इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. अंधेरी पोलिस ठाण्याचे पोलिसांनी खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला. अंधेरी पोलिस आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्तरित्या आंबिवलीची इराणी वस्ती गाठली. काल रात्री दोन वाजता पोलिस पथक आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले असता आरोपींच्या नातेवाईक आणि इराणी वस्तीतील पुरुष महिलांनी पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला केला. रात्रीच्या अंधारात पोलिसांवर हल्ला झाल्याने वर्सीत पांगापांग झाली. या हल्ल्यात दहा पोलिस जखमी झाले आहेत.

इराणी वस्तीतून अनेक गुन्हयातील आरोपी पोलिसांनी यापूर्वी पकडले आहे. पोलिस याठिकाणी चोरट्यांना पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकार घडलेले आहेत. २००८ साली गुन्हे शाखेचे एक पथक चोरट्याला पकडण्यासाठी इराणी वस्तीत गेले असता. पथकावर हल्ला केला होता. त्यावेळी पाेलिसांना गोळीबार करावा लागला हाेता. आत्तापर्यंत ५० वेळा तरी पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रकार घडलेले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी