शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अमृत महोत्सव; तुषार गांधी यांची सरकारच्या धोरणावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 07:38 IST

शहरातील बिर्ला महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रातर्फे ५ ते १२ मार्चदरम्यान युवा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का? ७५ वर्षांनंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृतमहोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. 

शहरातील बिर्ला महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रातर्फे ५ ते १२ मार्चदरम्यान युवा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गांधी यांना आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, अविनाश पाटील आणि सुरेश हतीपूर्ण आदी मान्यवर उपस्थित होते. 

तुषार गांधी म्हणाले की, ‘गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला का, तर त्याचे उत्तर नाही असे आहे. आजही देशात त्याच समस्या आहेत. आपण कालही गुलाम होतो. आजही गुलाम आहोत. उद्याही गुलामच राहणार. आपल्या देशात शैक्षणिक क्रांती घडविणे आवश्यक आहे. देशात जिथे रोजगार आहे, तिथे वास्तव्याची सोय नाही. जिथे वास्तव्याची सोय आणि सुरक्षा आहे, तिथे रोजगार नाही. ही स्थिती कोरोना काळात आपण आपल्या डोळ्यांदेखत पाहिली. कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या काळात मजूर आपल्या गावी पलायन करीत होते, हे भयावह चित्र भारतात दिसले.’, असेही त्यांनी सांगितले. 

नोकरीचीही हमी नाहीगांधी म्हणाले की , महात्मा गांधी यांना जाणून घ्यायचे असेल तर महात्मा म्हणून नव्हे, तर मोहनदास म्हणून ते काय जगले हे आधी जाणून घ्यावे लागेल. तरच तुम्ही महात्मा गांधीजींना जाणून घेऊ शकता. उच्चशिक्षण घेऊनही आपल्या देशातील तरुणांच्या हाताला रोजगार नाही. नोकरीची हमी नाही. इंजिनिअर, डॉक्टर  यांना रोजगाराची शाश्वती नाही, तर तिथे अन्य तरुणांचे काय होत असेल. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणतात की, इंजिनिअर झाला; पण नोकरी नाही तर भजी तळा आणि ती विका. त्यांना भजीच तळायची होती, तर त्यांनी शिक्षणावर १७ वर्षे वाया का घालवायची, असा प्रश्न गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.