शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे काम बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 14:44 IST

KDMC News: सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात आले.

कल्याण-सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेतील 400 सफाई कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली नाही तर यापूढे बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी दिली आहे. दरम्यान काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. 

    अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर काँग्रेस संघटनेचे कोषाध्यक्ष सूरज चिंडालिया यांनी सांगितले की, राज्यभरात सफाई कामगारांची संख्या 4 लाख इतकी आहे. राज्यभरातील महापालिका आणि पालिकांमध्ये 1 लाख सफाई कामगारांची पदे रिक्त आहे. ही पदे भरण्याऐवजी सरकारकडून खाजगी कंत्रटदाराला सफाईचे काम दिले जाते. कंत्रटी कामगारांची भरती केली जाते. राज्यभरात वारसा हक्कांची प्रकरणो विविध महापालिकांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी राज्य सरकारने जाचक अटी शर्ती लागू केल्या आहेत. त्यामुळे वारसा हक्कांची प्रकरणो प्रलंबित आहे. कोरोना काळात सफाई कामगारांना एक हजार रुपये भत्ता देण्याचे राज्य सरकारने जाहिर केले होते. त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर महापालिका करीत नाहीत. सफाई कामगारांच्या महामंडळाची घोषणा सरकारने केली होती. त्याची स्थापना अद्याप सुरु झालेली नाही. सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न निकाली काढलेला नाही या विविध मागण्यासाठी आज काम बंद आंदोलन केले गेले. या आंदोलनास केवळ केडीएमसीत नाही तर राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले की, ज्या कामगार संघटनेने हे आंदोलन केले ती संघटना मान्यताप्राप्त नाही. संघटनेच्या वतीने आंदोलनाची पूर्व सूचना दिली गेली नव्हती. या आंदोलनात महापालिकेतील एकूण 2200 सफाई कामगारांपैकी 400 कामगार सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांची एका दिवसाची वेतन कपात केली जाईल. त्यांच्या विरोधात आयुक्तांना ठोस अहवाल दिला जाणार आहे. त्याचबरोबर कामात कसूर केल्या प्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण