शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा, पुन्हा डांबरच! निवासी भागातील रहिवासी संभ्रमात : दिलासा तात्पुरता;  पण खड्ड्यांची मालिका जैसे थे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 11:34 IST

सध्या निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रोड, सुदर्शन नाका येथून घरडा सर्कलकडे जाणारा रोड, सिस्टर निवेदिता हायस्कूलसमोरील रोड, मिलापनगर तलाव,  निवासी भाग शेवटचा बस स्टॉप या रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील रस्ते लवकरच सिमेंट काँक्रीटचे होऊन खड्ड्यातून मुक्तता होणार, अशा आशयाचे जाहीर फलक जागोजागी लावून श्रेय लाटले गेले आहे. गुरुवारपासून एका महत्त्वाच्या रस्त्यावर डांबराचे पॅच पडू लागल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पावसाळ्यापूर्वी या डांबरीकरणाने काहीसा दिलासा मिळाला असला तरी काँक्रीटअभावी पावसाळ्यात यंदाही काही महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका जैसे थे राहणार यात शंका नाही. 

सध्या निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रोड, सुदर्शन नाका येथून घरडा सर्कलकडे जाणारा रोड, सिस्टर निवेदिता हायस्कूलसमोरील रोड, मिलापनगर तलाव,  निवासी भाग शेवटचा बस स्टॉप या रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. पण ती अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्यात या परिसरात पाणी साचून बंगले आणि सोसायट्यांत घुसण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मॉडेल कॉलेज परिसर आणि भाजी गल्लीचा रोड असो अथवा सर्व्हिस रोड हे महत्त्वाचे रस्तेही काँक्रीटचे होणे आवश्यक असताना यातील भाजी गल्लीच्या रोडवर सध्या डांबराचे पॅच मारले जात आहेत. त्यामुळे निवासी भागातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी ५६ कोटींचा मंजूर झालेला निधी नेमका कुठल्या रस्त्यासाठी वापरला जाणार, असाही प्रश्न रहिवाशांपुढे उभा राहिला आहे. 

डांबरी पॅच किती दिवस टिकतील हेही महत्त्वाचे आहे. विलंब लागला असता तरी परवडला असता; पण भाजीगल्लीसह, सर्व्हिस रोड सिमेंट काँक्रीटचा रस्ता होणे महत्त्वाचे होते. डांबराचे पॅच मारून नाहक खर्च कशाला, अशी भावनाही रहिवाशांची आहे. सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या पॅचवरूनही राजकीय पक्षांकडून श्रेय लाटणे सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दोन्ही रस्ते काँक्रीटचे होणे महत्त्वाचेसर्व्हिस रोड कल्याण-शीळ रोडला समांतर असल्याने त्यावरून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. सात वर्षे या रस्त्यासह अन्य महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांचा त्रास आम्ही सहन करीत आहाेत. गुरुवारपासून भाजी गल्ली रोडवर सुरू झालेले डांबरी पॅचचे काम पाहता आम्हा रहिवाशांत संभ्रम आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता करून एकदाच काय ते खड्ड्यांच्या त्रासातून मुक्त करणे आवश्यक असताना डांबरी पॅचने यंदाही खड्ड्यांचा सिलसिला कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.     -  जयसिंग आयरे, सुदामानगर निवासी, एमआयडीसी