शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

लग्न ठरले... लवकरच होणार होता साखरपुडा; पण त्याआधीच रोशनीला मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:16 IST

Roshani Songhare News: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात क्रू-मेंबर म्हणून काम करणाऱ्या रोशनीचा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये साखरपुडा होणार होता.

डोंबिवली - अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात क्रू-मेंबर म्हणून काम करणाऱ्या रोशनीचा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये साखरपुडा होणार होता. फेब्रुवारी-मार्चमध्ये लग्न होते. त्यासाठी हॉलची शोधाशोधही सुरू होती; पण त्याआधीच विमान दुर्घटनेत रोशनीवर काळाने घाला घातला. तिच्या कुटुंबासह मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनघरे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील आहे. नोकरीच्या निमित्ताने हे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. 

तिने जिद्दीने गाठले ध्येय रोशनी हिने शालेय शिक्षण घेत असतानाच हवाईसुंदरी होण्याचे ध्येय बाळगले होते. आधी दोन वर्षे स्पाइस जेट व नंतर एअर इंडिया विमान कंपनीत क्रू-मेंबर म्हणून ती काम करीत होती. रोशनीने मोठ्या जिद्दीने आपले ध्येय गाठले होते. दोनच दिवसांपूर्वी ती गावी गेली होती.

१५ वर्षांनी पुनरावृत्ती  २२ मे २०१० ला मंगळूर एअरपोर्टवर अहमदाबादप्रमाणेच अपघात झाला होता. त्या विमान दुर्घटनेत १६६ पैकी १५८ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सहा विमान कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यात केबिन क्रू-मेंबर आणि डोंबिवलीकर असलेल्या तेजल कामूलकर हिचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह दोन दिवसांनी कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. १५ वर्षांनंतर रोशनीच्या मृत्यूने पुन्हा एकदा पुनरावृत्ती घडली.

हवाईसुंदरी होण्याचे स्वप्नकुटुंबातील रोशनी सर्वात मोठी  होती. लहानपणापासून तिचे हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न होते. तिचे लग्न ठरले होते. लवकरच साखरपुडा होणार होता. लग्नासाठी हॉलची शोधाशोध सुरू होती. तिचा मृत्यू कुटुंबासाठी धक्कादायक घटना असल्याचे तिचे काका दत्ता सोनघरे यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच अहमदाबादला जाण्यासाठी ट्रेनचे तिकीट बुक केले.अपघातग्रस्तांच्या कुटुंबांसाठी एअर इंडिया विशेष विमान सोडणार असल्याची माहिती मिळाल्याने रोशनीचे वडील आणि भाऊ संध्याकाळी ५ वाजता मार्गस्थ झाले. रोशनीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनएचे नमुने घेण्यात आले. अहवालास ७२ तास लागतील, अशी माहिती दिल्याचे सोनघरे यांनी सांगितले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादdombivaliडोंबिवली