शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दौऱ्यापूर्वी कल्याणमधील रस्ते झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2022 11:11 IST

कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्वसी सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कल्याणात येत आहेत.

कल्याण - शहरात  कोणी बडा नेता येणार असला की सर्व यंत्रणा कशा कामाला लागतात...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डोंबिवली दौरा झाला तेव्हाही मोठ्या प्रमाणावर शहरात स्वच्छता करण्यात आली  होती...शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री हे कल्याणात येणार असल्याने रस्ते चकाचक करण्यात आले  होते...अचानक शहरात हा कायापालट कसा काय? असा विचार करत नागरीकांनीही भुवया उंचावल्या होत्या.

कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्वसी सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कल्याणात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून ते येणारे मार्ग अत्यंत सुव्यवस्थित आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय..काही वर्षांपूर्वी गडकरी यांनी डोंबिवली शहराचा उल्लेख अत्यंत घाणेरडे शहर म्हणून केला होता.  तशी वेळ पुन्हा कल्याण शहराच्या नशिबी  येऊ नये यासाठी जोरदार तयारी करण्यात आलीये.

गडकरी यांच्या नजरेत  कल्याण शहर  सुंदर दिसण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने आटापिटा चालवला आहे. ते येणाऱ्या रस्त्यावरील पावसाळ्यापासूनचे खड्डे रातोरात भरले असून त्या रस्त्यांची सजावटही केली जात आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फवारणी सुद्धा करण्यात आलीये..मुख्य रस्ते जरी चांगले दिसत असले तरी याच रस्त्यांना लागून असणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर मात्र दुरवस्था दिसत आहे. त्यामुळे रोज मंत्र्यांचे दौरे शहरात झाले तर शहर किती सुंदर दिसेल अशा उपरोधिक भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाNitin Gadkariनितीन गडकरी